ज्ञानाचे पारसमणी भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे निसर्गाने मुक्त उधळण केलेला प्रदेश म्हणून ओळख असलेल्या कोकणाने देशाला ६ भारतरत्न दिले. याच कोकणातील व्यक्तिमत्वरुपी रत्नांचे कोंदण असलेली भूमी अर्थात रत्नागिरी.. याच रत्ननगरीच्या मातीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे.... आदरणीय डॉ काणे यांनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर इंग्रजांच्या जुलमी आणि अन्यायाच्या दुष्काळात ज्ञानाची गंगा प्रवाहित केली. आज त्यांची पुण्यतिथी.. आदरणीय डॉ. काणे यांचा जन्म ७ मे १८८० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम येथे झाला. आदरणीय डॉ. काणे यांचा चिपळूणच्या सरकारी शाळेपासून ते भारतरत्न पुरस्कारापर्यंतचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. याच महान विभूतीच्या सान्निध्यात ज्ञानाचा उत्कर्ष व्हावा यासाठी रत्नागिरी शहरात सर्वप्रथम कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे उपकेंद्र २०२१ साली सुरु झाले. रत्नागिरी उपकेंद्राची वास्तु ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी इ. सन १८६३ मध्ये शासकीय इंग्रजी माध्यमाची शाळा होती. याच शाळेत डॉ. काणे सन १...