Posts

हिंदू धर्मातील सामान्य संस्कार आणि आचार - भाग 2

Image
   संस्कार   प्रा. कश्मिरा दळी             सहाय्यक प्राध्यापिका ,  भारतरत्न    डॉ. पां.वा. काणे           संस्कृत अध्ययन केंद्र ,  रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक   प्रत्येक धर्मामध्ये आपल्या अनुयायांसाठी काही संस्कार व आचार विहित केलेले असतात . संस्कार हा शब्द साधारणपणे पुढील अर्थांनी वापरला जातो ( १ ) जीवावरील आवरण (कोश) शुद्ध करण्यात आणि विजय प्राप्त करवून देण्यात   मदत करणे ; ( २ ) त्याच्या सहाय्यासाठी उच्च बुद्धिमत्ता असलेल्या जसे की देव आणि ऋषींना त्याच्या पर्यंत पोहोचवणे ; ( ३ ) त्याच्या सभोवतालचे वातावरण सुधारण्यासाठी आणि त्यामुळे त्याला मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता साधण्यास सौकर्य प्राप्त करवून देणे.   या उद्देशासाठी भौतिक वस्तू , मुद्रा , आसने आणि शब्द यांचा वापर केला जातो , इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी काळजीपूर्वक सुव्यवस्थित अशी यांची मांडणी केली जाते. विनियोग केल्या जाणाऱ्या वस्तू या त्यांच्या उत्तम आकर्षण शक्तीसाठी निवडलेल्या असतात , जसे की एखाद्या विशिष्...

दृश्य आणि अदृश्य लोक

Image
दृश्य आणि अदृश्य लोक प्रा. कश्मिरा दळी             सहाय्यक प्राध्यापिका , भारतरत्न   डॉ. पां.वा. काणे           संस्कृत अध्ययन केंद्र , रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक     आपल्याला सर्वांना फक्त आपल्या सभोवतालचे एक जग माहीत आहे , जे आपण आपल्या इंद्रियांनी पाहू शकतो , ऐकू शकतो , स्पर्श करू शकतो , चव घेऊ शकतो आणि वास घेऊ शकतो . विज्ञान आपल्याला या जगाच्या अनेक भागांविषयी सांगते जे आपल्या इंद्रियांच्याद्वारे ग्रहण करणे शक्य नाही . जे अतिशय सूक्ष्म असल्यामुळे डोळ्यांना दिसत नाहीत. आपल्या इंद्रियांवर परिणाम करण्यास अतिशय सूक्ष्म असे ते घटक आहेत. परंतु आज विज्ञान आपल्याला इंद्रियातीत असणाऱ्या अशा काही गोष्टींचा परिचय करून देते ज्या भौतिक जगतापेक्षा बाह्य नाहीत . त्या अदृश्य असल्या तरी जगाचाच एक भाग आहेत. भौतिक पदार्थांमध्ये एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेल्या घन पदार्थ , द्रव , वायू , बाष्प , आणि अवकाश या सर्व गोष्टींचा समावेश आहे. परंतु आपण दुसऱ्या जगाविषयी म्हणजे जे इंद्रियातीत असून या जगाचा भाग नाही...

यज्ञ

Image
  यज्ञ    प्रा. कश्मिरा दळी            सहाय्यक प्राध्यापिका, भारतरत्न  डॉ. पां.वा. काणे         संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक भारतामध्ये " यज्ञ " ही संकल्पना सुपरिचीत आहे , परंतु सर्व यज्ञांमधील निहित सिद्धान्त समजून घेणे आवश्यक आहे , जेणेकरून हे समजेल की , प्रत्येकाने इतरांच्या कल्याणासाठी स्वतः बलिदान केले पाहिजे आणि इतर गोष्टींचे सर्व बलिदान हे माणसाला सरते शेवटी स्वतःचे बलिदान कसे द्यावे हे शिकवण्यासाठी आहे. सर्व प्रथम हे समजून घेणे गरजेचे आहे की , हे संपूर्ण विश्व एका यज्ञाचे स्वरूप आहे . ईश्वर जो वस्तुतः व्यापक आहे तोसुद्धा हे विश्व प्रकट व्हावे या हेतुने स्वतःला मर्यादित करतो . श्रुती आणि स्मृती सुद्धा हेच सत्य ( हाच सिद्धांत ) घोषित करतात . जसे की ऋग्वेदातील पुरुष सूक्तात किंवा श्रीकृष्णाने स्वतः उल्लेख केला आहे की संपूर्ण जगतामध्ये प्राण्यांचा आविर्भाव हा यज्ञाचा एक परिणाम आहे . आध्यात्मिकदृष्ट्या तत्वामध्ये विलीन होण्यास मृत्यु म्हटले जाते ; त्याचप्रमाणे ईश्वराने स्वत :...

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

Image
  राराजतां संस्कृतम् प्रा. अविनाश-चव्हाणः सहाय्यक-प्राध्यापकः भारतरत्न-डा. पाण्डुरङ्ग-वामन-काणे संस्कृत-अध्ययन-केन्द्रम्,  रत्नागिरी-उपकेन्द्रम् क.का.सं.वि. रामटेकम् आभारतं श्रावणमासस्य पौर्णिमां निमित्तीकृत्य संस्कृतमहोत्सवाः संस्कृतपाठशालासु विश्वविद्यापीठेषु विद्यालयेषु चायोज्यन्ते। पुरा अस्मिन् दिने एव बालानामुपनयसंस्कारं विधाय बालाः गुरुकुलेषु विद्यारम्भाय प्रेष्यन्ते स्म। अतः अद्यापि क्वचिदस्याः भारतीयसंस्कृतेः स्मरणार्थं संस्कृतदिनस्य आचरणं क्रियते। क्वचिदेतन्निमित्तमामासं कुत्रचिद् आसप्ताहं क्वचित् आदिनं संस्कृतं वदामः इति संस्कृतानुरागिणः प्रतिजानन्ति। संस्कृतविषये एषा पङ्किः प्रसिद्धा “भाषास मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती” इति।  कस्मादियं भाषा मुख्या मधुरा दिव्या वोच्यत इति जिज्ञासायामत्र केचनांशा अवधेयाः – Many words – One Meaning - संस्कृतभाषायाः वैशिष्ट्यं यदस्यां भाषायां एकस्य शब्दस्य कृते नानासमानार्थशब्दा भवन्ति। शब्दास्तु नाना परं तेषामर्थस्वैक एव भवति। अयम्प्रकारोऽन्यासु भाषास्वपि क्वचित्क्वचिदस्ति किन्तु संस्कृतापेक्ष्यं प्रमाणेन न्यूनमेव। यथा – आङ्...

कर्म

Image
  कर्म         प्रा. कश्मिरा दळी            सहाय्यक प्राध्यापिका, भारतरत्न  डॉ. पां.वा. काणे         संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक   कर्म हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ क्रिया असा होतो, परंतु सर्वसाधारणपणे कर्म या शब्दाचा उपयोग जे आज केले गेले आहे त्यासंबधाने पुढे जे केले जाईल ते  दाखवण्यासाठीसुद्धा करतात. कुठलीही गोष्ट केवळ अपघाताने, योगायोगाने, किंवा विकाराने घडत नाही, तर ती एका साखळीत (क्रमाने) घडते; एका नंतर दुसरी अशा क्रमाने अनुसर णकरत असते. जेव्हा बीज जमिनीत पेरले जाते तेव्हा ते अंकुरित होऊन वर येते, आणि त्याला पाने फुटतात, फुले येतात, आणि मग फळेसुद्धा येतात आणि फळांमध्ये पुन्हा बीजे   असतात, पुन्हा त्यांच्यातील एक बीज पेरले असता त्यातून पुन्हा अंकुर, पाने, फुले, फळे आणि पुन्हा बीजे तयार होतात. जसे बीज असते अगदी त्याच प्रकारचे बियाणे तयार होते, तांदुळापासून तांदुळच तयार होतात; गव्हापासून गहूच तयार होतो; काटेरी वनस्पतीपासून काटेरी वनस्पतीच; ...