दृश्य आणि अदृश्य लोक
दृश्य आणि अदृश्य लोक
प्रा. कश्मिरा दळी
सहाय्यक प्राध्यापिका,
भारतरत्न डॉ. पां.वा. काणे
संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक
आपल्याला सर्वांना फक्त आपल्या सभोवतालचे एक जग माहीत
आहे, जे आपण आपल्या इंद्रियांनी पाहू शकतो,
ऐकू शकतो, स्पर्श करू शकतो, चव घेऊ शकतो आणि वास घेऊ शकतो. विज्ञान आपल्याला या जगाच्या
अनेक भागांविषयी सांगते जे आपल्या इंद्रियांच्याद्वारे ग्रहण करणे शक्य नाही.
जे अतिशय सूक्ष्म असल्यामुळे डोळ्यांना दिसत नाहीत. आपल्या इंद्रियांवर
परिणाम करण्यास अतिशय सूक्ष्म असे ते घटक आहेत. परंतु आज विज्ञान आपल्याला इंद्रियातीत
असणाऱ्या अशा काही गोष्टींचा परिचय करून देते ज्या भौतिक जगतापेक्षा बाह्य नाहीत. त्या अदृश्य असल्या तरी जगाचाच एक भाग आहेत. भौतिक पदार्थांमध्ये एकाच प्रकारच्या
अणूंनी बनलेल्या घन पदार्थ, द्रव, वायू,
बाष्प, आणि अवकाश या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
परंतु आपण दुसऱ्या जगाविषयी म्हणजे जे इंद्रियातीत
असून या जगाचा भाग नाही. मरणानंतर पृथ्वीवरून माणूस ज्या लोकात जातो अशा परालोकाविषयी
आपण ऐकले आहे. त्रीलोकाविषयी आपण वाचतो आणि याविषयी
आपल्याला काहीतरी माहिती असली पाहिजे, कारण या तिन्ही लोकांमध्ये
जीव जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकलेला असतो आणि त्यातच त्याची उत्क्रांती
होते. हे तिन्ही लोक एक ब्रह्माचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
अफाट कालखंडाच्या प्रारंभी निर्माण होतात आणि ते कल्पाच्या शेवटी नाश पावतात.
याच्यां व्यतिरिक्त इतर चार महालोक सुद्धा आहेत ज्यांनी मिळून हे ब्रह्मांड
पूर्ण होते, परंतु ते महालोक ब्रह्मदेवाच्या जीवनापर्यंत अस्तित्वात
राहतात. आपल्याला येथे त्यांच्याविषयी विचार करावयाची आवश्यकता
नाही. महालोकांमध्ये काही उपविभाग देखील आहेत, ज्यांना लोक असेच समान नाव दिले गेले आहे. जसे की, भुवर्लोकातील
प्रेतलोक, पितृलोक आणि स्वर्गलोकातील इंद्रलोक आणि सूर्यलोक.
आता आपण ज्या तीन लोकांशी संबंधित आहोत त्यांच्या विषयी
जाणून घेऊ – भूर्लोक म्हणजे भौतिक जग किंवा पृथ्वी;
भुवर्लोक, “होणारे जग” - पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातील मध्यवर्ती अंतराळ; आणि
स्वर्गलोक किंवा देवलोक. या तिघांपैकी भूर्लोक काही अंशी दृश्यमान
आणि काही अंशी अदृश्य आहे; भुवर्लोक आणि स्वर्गलोक हे अदृश्य
आहेत. भूर्लोक हा पृथ्वी तत्वाने बनलेला आहे, दिसणाऱ्या जगताचे सारे रूप त्या पृथ्वीतत्त्वाने बनलेले आहे. ते घन,
द्रव, वायू, तेज,
अवकाश, उच्च अवकाश, आणि परमाणु
अशा सात रूपांमध्ये अस्तित्वात आहे. यातील शेवटच्या चार रूपांना ‘अवकाश’ म्हटले जाते.
अशाप्रकारे भुवर्लोकाचे उपादान जल तत्त्व असून या जलाची सात रुपांतरे होतात ज्याचा आधार जल तत्त्व आहे. स्वर्गलोकातही अशीच सात रुपांतरे आहेत, परंतु त्यांचा आधार अग्नितत्त्व आहे.
प्रत्येक जीवाच्या शरीरामध्ये तीन कोश असतात जे त्रीलोका
सामान आहेत. अन्नमयकोश, प्राणमयकोश आणि मनोमयकोश. अन्नमयकोश, किंवा अन्नकोश हा आपण भक्षण करत असलेल्या
अन्नापासून बनलेला आहे. पृथ्वीच्या दृश्य स्वरूपाशी संबंधित असून घन, द्रव आणि वायूंनी
बनलेला असते. प्राणमयकोश किंवा प्राणकोश, आपल्या पृथ्वीच्या अदृश्य भागाशी संबंधित आहे आणि तो अवकाशाने बनलेला आहे.
प्राण ही जीवन-ऊर्जा आहे. आणि विज्ञान ज्यांना
चुंबकीय शक्ती आणि विद्युत शक्ती म्हणते त्या सर्व शक्तींचा समावेश यात होतो. परंतु
यापेक्षाही बरेच काही यात सामावलेले आहे. हे दोन्ही कोश भूर्लोकाशी जोडलेले आहेत.
मनोमयकोश याचे दोन भाग आहेत; स्थूलभाग, ज्यामध्ये वासनांचे स्थान आहे, तो भुवर्लोकाशी जोडलेला आहे; सूक्ष्म भाग, ज्यामध्ये भावना आणि विचार असतात, याचा संबंध स्वर्गलोकाशी
आहे.
ज्या उद्देशाने वस्तूंचे वर्गीकरण केले जाते त्यानुसार
या कोशांना इतर नावे वापरली जातात, परंतु विद्यार्थ्यांनी
या विषयी गोंधळून जाऊ नये, कारण तो जसजसा तो पुढे जाईल तसतसे
त्याला असे दिसून येईल की त्याच्या वाढलेल्या ज्ञानामुळे ते समजून घेणे खूप सुगम बनले
आहे, आता आपल्याला सामान्यपणे वापरली जाणारी फक्त तीनच नावे आढळतील.
मनुष्याचे स्थूल शरीर, अन्नमयकोशासारखेच आहे, जे घन पदार्थ, द्रव आणि वायूंनी
बनलेले आहे. सूक्ष्मशरीर, या शरीरात प्राणमयकोश
आणि मनोमयकोश यांचा समावेश होतो; या व्यतिरिक्त, त्यात आणखी एक कोश समाविष्ट असतो तो म्हणजे विज्ञानमयकोश. या विज्ञानमयकोशाच्या आधाराने मनुष्याचा संबंध त्रिलोकाच्या पलीकडे असलेल्या
महालोकांशी येतो, ज्याच्यामध्ये मनुष्याला त्याची ऊर्ध्व गमन
वृत्ति घेऊन जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटीसुद्धा याचे
इथे राहणे शक्य नसते. जन्म-मृत्यूच्या मालिकेत
हा सूक्ष्मशरीराचा भाग, विज्ञानमयकोश, हा
इतरांच्या तुलनेने शाश्वत आणि टिकणारा आहे.
खालील तक्त्यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म शरीराचे भेद आणि
त्यांच्या संबंधित लोकांचा संबंध दाखवला आहे - याद्वारे अधिक
स्पष्टता प्राप्त होईल. -
|
शरीर |
लोक |
कोश |
|
स्थूल |
भुर्लोक |
अन्नमय |
|
सूक्ष्म |
भुर्लोक |
प्राणमय |
|
सूक्ष्म |
भुवर्लोक |
मनोमय |
|
सूक्ष्म |
स्वर्गलोक |
मनोमय |
|
(हे मृत्यूच्या वेळी किंवा नंतर नष्ट होतात आणि पुनर्जन्माच्या
वेळी नव्याने धारण केले जातात.) |
||
|
सूक्ष्म (कारण) |
महलोक |
विज्ञानमय |
|
(हे मृत्यूनंतर नष्ट होत नाही, म्हणून पुनर्जन्मानंतर नव्याने धारण केले जात नाही.) |
||
स्थूलशरीरामध्ये क्रिया करणाऱ्या अवयवांचा जसे हात, पाय, वाणी, जननेन्द्रिय आणि गुद्वार समावेश होतो, ज्यांना
‘कर्मेंद्रिय’ असे म्हणतात. पण वस्तुतः कर्मेंद्रियांना निर्देशित आणि नियंत्रित करणारी शक्ती मनुष्याच्या
सूक्ष्मशरीरातच असते. अशा प्रकारे आनंद, किंवा दुःख, किंवा कोणतीही तीव्र भावना, सूक्ष्म शरीरावर आणि त्यांच्याद्वारे अवयवांवर परिणाम करतात, जसे हात थरथरणे, पायांचे थबकणे आणि चिडचिडेपणामुळे वाणी
बाधित होते अशाप्रकारे कर्मेंद्रिय प्रतिक्रिया दाखवतात. डोळे,
कान, जीभ, नाक आणि त्वचा
इत्यादि ज्ञानेंद्रिय जरी स्थूल शरीरात असली तरी त्यांचा संबंध सूक्ष्म शरीराशी असतो.
आता मृत्यूनंतर काय होते ते पाहू. प्रथम जेव्हा मरण येते तेव्हा प्राणमय कोशाच्या माध्यमाने स्थूलशरीरापासून
सूक्ष्मशरीर विभक्त होते, तेव्हा ते शरीर प्राणहीन म्हणजे निर्जीव
होऊन जाते. अर्थात ज्या पदार्थांना प्राणाने स्थूलशरीरामध्ये
धारण करुन ठेवले होते; ते आता प्राणरहित होतात. त्यावेळी शरीराच्या वेगवेगळ्या कोशांमध्ये प्राण राहतो पण मरण पावल्यावर हे
कोश एक दुसऱ्यापासून विलग होऊन दूर जाऊ लागतात. त्यावेळी जीव
सूक्ष्म शरीरात राहतो आणि लगेचच प्राणमयकोश आणि नंतर मनोमयकोशाच्या स्थूलतर भागास त्याच्या
बाह्य वस्त्राप्रमाणे झटकून टाकतो, तेव्हा त्याला प्रेत म्हणतात.
तो प्रेतलोकाचा निवासी बनतो. जर त्याने मागे टाकलेल्या
जीवन चांगले कर्म आणि भावनांनी व्यतीत केले असेल तर प्रेतलोकात सुद्धा आनंदाने सुखस्वप्नात
राहतो; पण जर त्याने वाईट कर्म किंवा भावनांचा मागच्या जन्मात
अवलंब केला असेल तर प्रेतलोकात दुःख सहन करतो. पृथ्वीवरील सुखांसाठी
तो तळमळतो जी त्याला आता प्राप्त करणे शक्य नाही. अशाप्रकारे
जोपर्यंत इच्छांची तीव्रता समाप्त होत नाही तोपर्यंत कमी किंवा अधिक कालावधीपर्यंत त्याला तिथेच राहावे
लागते. मग त्याचा स्थूलतम मनोमयकोश वेगळा होतो आणि नंतर तो पितृलोकात
पितर होऊन पोहोचतो. तिथे त्याचा मनोमयकोश शुद्ध होऊन जातो,
स्वर्गलोकास्तव अनुपयुक्त भावना शुद्ध होतात आणि तो स्वर्गलोकात जाऊन
जीवनात केलेल्या चांगल्या कर्मांच्या फळांचा उपभोग तो घेतो.
जेव्हा हे पुण्य संपते, आणि त्याची पृथ्वीवर परत येण्याची वेळ येते तेव्हा हा शुद्ध झालेला मनोमयकोश
नाहिसा होतो आणि हा जीव विज्ञानमयकोशात अवशिष्ट राहतो.
अशा अवस्थेत जीव लगेचच नवीन मनोमयकोश (आपल्या स्वभाव व प्रकृतिनुसार) तयार करण्यासाठी आपली
शक्ती लावतो आणि मर्त्यलोकामध्ये त्याच्या पुढील जीवनासाठी एका नवीन मनोमयकोशात प्रवेश
करतो. देव त्याच्या कर्मानुरूप त्याच्यासाठी प्राणमयकोश आणि अन्नमयकोश
तयार करतो आणि त्याला पुन्हा भुर्लोकात जन्माला घालतो.
जीवाच्या जन्मरूप यात्रेचे हे टप्पे आहेत; दृश्यमान जगातील जीवन, मृत्यू, अदृश्य जगातील जीवन आणि पुनर्जन्म यांची वेळोवेळी पुनरावृत्ती होते.
शेवटी, जीव या तिन्ही जगांना कंटाळतो, आणि उच्च, सूक्ष्म आणि अधिक विस्तारित जीवनाची आशा करतो;
तो या सर्व जगांपासून दूर जातो आणि त्याला ध्यान, उपासनेत, दुर्बलांना दयाळूपणे मदत करण्यात आनंद मिळतो;
तो यापुढे आपली शरीररूपी साधने स्वतःला आनंद मिळवण्यासाठी वापरत नाही,
परंतु केवळ इतरांची सेवा करण्यासाठी वापरतो, आणि
म्हणून इतरांसाठी वापरल्याने ते त्याला यापुढे बंधनात अडकवू शकत नाही. तो उच्च लोकांमध्ये राहतो, आपल्या शरीररूप यंत्राने या
जगामध्ये दुसऱ्यांच्या हितास्तव व्यवहार करतो आणि ईश्वराचा एक सहकारी बनतो.
जसे ईश्वर सर्वदा दुसऱ्यांच्या कल्याण करतो तसेच हा देखिल सर्वांच्या
कल्याणासाठी त्या साधनांचा उपयोग करतो आणि शेवटी ब्रह्मात लीन होतो.
(संदर्भ: १९१६ साली Central Hindu College Banaras येथून प्रकाशित झालेल्या SANATAN DHARMA AN ELEMENTARY TEXTBOOK - OF HINDU RELIGION AND
ETHICS या मूळ इंग्रजी पुस्तकातील
अनुवाद क्रमशः...)
Comments
Post a Comment