Posts

Showing posts from June, 2022

योगशास्त्र अध्ययनाच्या नव्या संधी

Image
योगशास्त्र अध्ययनाच्या नव्या संधी कु. कश्मिरा दळी साहाय्यक प्राध्यापिका  भारतीय दर्शन विभाग क.का.सं.वि.                  तंत्रज्ञानाच्या युगात नवनव्या विद्याशाखांमध्ये अध्ययनाच्या संधी उपलब्ध होत आहेत. अशीच सध्या योगशास्त्र ही एक नवी विद्याशाखा म्हणून विकसित होत आहे. बदलत्या काळाबरोबर माणसाची जीवनशैलीही बदलते आहे. या बदलत्या जीवनशैलीबरोबर धकाधकीच्या जीवनात तारेवरची कसरत करत आपल्या जीवनाचा तोल सावरण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो आहे . या व्यस्त जीवनशैलीत दैनंदिन घडामोडींचा समतोल साधण्यात आपल्या जीवनाचा पाया असेल्या आपल्या शरीराकडे बरेचदा आपले   दुर्लक्ष होते. स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत हेळसांड केली जाते. परंतु शारीरिक, मानसिक स्वास्थ्य संतुलि त राहावे यासाठी हल्ली प्रत्येकजण सजग झालेले आपण पाहतो आहोत. शारीरिक , मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योग ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. योग हा जणू मानवी जीवनाचा अविभाज्य घटकच होऊ पाहत आहे. देश विदेशातून योग शिकणाऱ्यांची आणि योग शिकून उद्योग करणाऱ्यांची संख्या द...

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्रातील विविध अभ्यासक्रम

Image
  कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्रातील विविध अभ्यासक्रम - आशिष आठवले समन्वयक, मुक्त व दूरस्थ शिक्षण केंद्र , क.का.सं.वि. रत्नागिरी उपकेंद्र अभ्यासक्रमांची माहिती   नियमित अभ्यासक्रम – पदवी , पदव्युत्तर पदवी आणि पदविका   १. बी. ए. योगशास्त्र – हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. यामध्ये संस्कृत अध्ययन, योग या विषयाचे शास्त्र म्हणून अध्ययन, भारतातील विविध योगशाखा तसेच योग प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांना करता येतात. हा अभ्यासक्रम नियमित स्वरूपाचा आहे.   २. बी. ए. कीर्तनशास्त्र – विद्यापीठाच्या धर्म, तत्त्वज्ञान व संस्कृती विभागामार्फत चालवला जाणारा हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. यामध्ये मराठी साहित्य , संस्कृत साहित्य तसेच भारतीय तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे. कीर्तन संगीत, भारतीय संगीत व कीर्तन प्रात्यक्षिक यांचाही समावेश यामध्ये आहे.   ३. एम. ...

योग - काळाची गरज

Image
योग : काळाची गरज             सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व क्षेत्रात उत्तुंग यशाची शिखरे सर करण्यात मानव यशस्वी होत आहे. यंत्र, तंत्राच्या सहाय्याने दिवसागणिक होत चाललेले   प्रत्येक क्षेत्रातील विकासाचे चढते आलेख तर आपल्या डोळ्यासमोरच आहेत. या सगळ्या चढा ओढीत शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्याचा समतोल कदाचित ढळलेला दिसतो त्यामुळे सर्व सुविधा उपलब्ध असूनही सध्या माणसे सुखाच्या शोधात,मानसिक शांतीच्या शोधात भ्रमंती करताना आपण पाहतो. भौतिक सुविधा उपलब्ध असूनही शारीरिक मानसिक स्वास्थ्याचा समतोल साधून आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहणे, स्वविकासाबरोबरच सामाजिक विकासात योगदान देणे हे प्रत्येकासाठीच आव्हान आहे. स्वपासून सुरु होणारी आणि समग्रापावेतो नेणारी जीवनयात्रा सफल करावयाची असेल आणि जीवनात शाश्वत आनंदाची अनुभूती घ्यावयाची असेल तर मानवी शरीर हे त्यासाठी उत्तम साधन होय आणि या शरीराचे स्वास्थ्य उत्तम राखायचे असेल तर योग साधना ही गुरुकिल्ली होय. अपि क्रीयार्थं सुलभं समित्कुशं जालान्यपि स्नानविधिक्षमाणि ते । अपि स्वशत्क्या त...