कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्रातील विविध अभ्यासक्रम
कविकुलगुरू कालिदास संस्कृत
विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्रातील विविध अभ्यासक्रम
- आशिष आठवले
समन्वयक, मुक्त व दूरस्थ शिक्षण
केंद्र,
क.का.सं.वि. रत्नागिरी उपकेंद्र
अभ्यासक्रमांची माहिती
नियमित अभ्यासक्रम – पदवी,
पदव्युत्तर पदवी आणि पदविका
१. बी. ए. योगशास्त्र – हा तीन
वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण
होणे अनिवार्य आहे. यामध्ये संस्कृत अध्ययन, योग या विषयाचे शास्त्र म्हणून
अध्ययन, भारतातील विविध योगशाखा तसेच योग प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांना करता
येतात. हा अभ्यासक्रम नियमित स्वरूपाचा आहे.
२. बी. ए. कीर्तनशास्त्र –
विद्यापीठाच्या धर्म, तत्त्वज्ञान व संस्कृती विभागामार्फत चालवला जाणारा हा तीन
वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण
होणे अनिवार्य आहे. यामध्ये मराठी साहित्य, संस्कृत
साहित्य तसेच भारतीय तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे.
कीर्तन संगीत, भारतीय संगीत व कीर्तन प्रात्यक्षिक यांचाही समावेश यामध्ये आहे.
३. एम. ए. मराठी – हा अभ्यासक्रम
दोन वर्षांचा असून कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश
घेण्यास पात्र आहे. मराठी विषयातील हा स्नातकोत्तर पदवी अभ्यासक्रम भारतीय
ज्ञानपरंपरा, भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र तसेच संस्कृत व्याकरणाची तोंडओळख करून
देणारा अभ्यासक्रम आहे. पुस्तक संपादन, अनुवाद कौशल्य असे अनेक उपयुक्त
विषय या अभ्यासक्रमात शिकता येतात.
४. वास्तुशास्त्र पदविका
अभ्यासक्रम – या एक वर्षाच्या अभ्यासक्रमात वास्तू मुहूर्त, वास्तू सिद्धांत,
पारंपारिक वास्तू इ. विविध विषयांच्या अध्ययनाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.
बारावी परीक्षा उतीर्ण असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत.
५. वेदांग ज्योतिष पदव्युत्तर
पदविका अभ्यासक्रम - या एक वर्षाच्या अभ्यासक्रमात संस्कृत,
संहिता, ज्योतिर्गणित, इ. अनेक कुतूहलपूर्ण विषय शिकवले जातात.
ज्योतिष शास्त्राचा वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणारा हा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही
शाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो.
मुक्त व दूरस्थ शिक्षण केंद्र
विद्यापीठांतर्गत
मुक्त व दूरस्थ शिक्षण केंद्र चालवले जाते. त्याचे अध्ययन सहाय्यक केंद्र
रत्नागिरी उपकेंद्रात स्थापन करण्यात आले असून पुढील अभ्यासक्रम या केंद्रांतर्गत
चालवले जातात. मुक्त व दूरस्थ शिक्षण केंद्रांतर्गत सर्व अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन
आवश्यकतेनुसार Online पद्धतीने केले जाते. लेखी परीक्षा मात्र प्रत्यक्षच होतात.
१. एम. ए. योगशास्त्र – हा दोन
वर्षांचा स्नातकोत्तर पदवी अभ्यासक्रम आहे. योग या विषयाचे शास्त्र म्हणून अध्ययन,
पातंजल योगसूत्रांचे अध्ययन, योग तत्त्वज्ञान, योगाची उपयुक्तता असे अनेक विषय या
अभ्यासक्रमात अभ्यासता येतील.
२. एम. ए. संस्कृत - हा दोन वर्षांचा स्नातकोत्तर पदवी
अभ्यासक्रम आहे. संस्कृत साहित्य, दर्शनसाहित्य, संस्कृत व्याकरण,
वैदिक साहित्य, हस्तलिखितशास्त्र, भाषाशास्त्र अशा अनेक विषयांचा अभ्यास करण्याची
संधी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मिळते.
मुक्त व
दूरस्थ शिक्षण केंद्रांतर्गत सर्व अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन आवश्यकतेनुसार Online
पद्धतीने केले जाते. लेखी परीक्षा मात्र प्रत्यक्षच होतात. विद्यार्थ्यांना
अभ्यासासाठी आवश्यक साहित्य पुरवले जाते व संपर्क सत्रांचेही आयोजन केले जाते.
याशिवाय मुक्त
व दूरस्थ शिक्षण केंद्रांतर्गत विविध प्रमाणपत्रीय अभ्यासक्रमही चालवले जातात.
यामध्ये गीता, संस्कृत संभाषण, वेदांग ज्योतिष, संस्कृत आगम,
कौटिलीय अर्थशास्त्र व आधुनिक राष्ट्राची उभारणी अशा विषयांचा समावेश आहे. याबाबत
पूर्वसूचना देऊन हे अभ्यासक्रम अल्पकालिक अभ्यासक्रम घोषित केले जातात.
अभ्यासक्रमांची उपयोगिता –
विश्वविद्यालयाचे
हे सर्व अभ्यासक्रम विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून चालवले जातात. नव्या राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश आधुनिक अभ्यासक्रमांमध्ये व्हावा अशी
अपेक्षा व्यक्त केली आहे. हे सर्व अभ्यासक्रम तोच दृष्टिकोन समोर ठेवून योजण्यात
आले आहे. योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतेच आहे. अशा परिस्थितीत योग विषयातील पदवी
व पदव्युत्तरपदवी असे दोनही अभ्यासक्रम या उपकेंद्राच्या माध्यमातून रत्नागिरी
जिल्ह्यात प्रथमच चालवले जात आहेत. Applied Yoga सह मूळ शास्त्राच्या अध्ययनालाही
महत्त्व देण्यात आले आहे.
एम.
ए. मराठी / बी. ए. कीर्तनशास्त्र असे विषय थेट अपल्या संस्कृतची ओळख करून देणारे
आहेत. तर मुक्त व दूरस्थ शिक्षण केंद्रातून चालवले जाणारे अभ्यासक्रम
विद्यार्थ्यांच्या सोयीचे आहेत.
पात्र
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची तरतूद नियमित अभ्यासक्रमात आहे. उपकेंद्रातील
ग्रंथालय उपयुक्त पुस्तकांनी सुसज्ज होत असून प्रत्यक्ष अभ्यासक्रम चालवण्यासाठी
पुरेशा वर्गखोल्या अद्ययावत सुविधांनी युक्त आहेत.
विश्वविद्यालय व उपकेंद्राविषयी
थोडक्यात -
कविकुलगुरू
कालिदास संस्कृत विश्वविद्यालय हे महाराष्ट्र शासनाद्वारे स्थापित महाराष्ट्रातील
एकमेव संस्कृत विश्वविद्यालय आहे. या विद्यापीठांतर्गत पारंपारिक आणि आधुनिक
अभ्यासक्रमांची सांगड घालण्यात आलेली आहे. Tradition for Innovation हे
विद्यापीठेचे उद्दिष्ट आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून संस्कृतभाषेचा प्रचार
व्हावा म्हणून महाराष्ट्रात विद्यापीठाची उपकेंद्रे स्थापन करण्यात येत आहेत.
त्यापैकी पाहिले उपकेंद्र कोकणात रत्नागिरी येथे स्थापन करण्यात आले असून “भारतरत्न
डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र” असे या उपकेंद्राचे नामकरण करण्यात
आले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी पत्ता व संपर्क पुढीलप्रमाणे -
कविकुलगुरू कालिदास संस्कृत
विश्वविद्यालय रामटेक
रत्नागिरी-उपकेंद्र
रत्नागिरी उपकेंद्र कार्यालय, ३रा
मजला,
अरिहंत मॉल, बिल्डींग
ब्लॉक३३-३४,
मुख्य बसस्थानकासमोर रत्नगिरी
४१५६१२
संपर्क : ८६००५२६८८२





Comments
Post a Comment