दृश्य आणि अदृश्य लोक
दृश्य आणि अदृश्य लोक प्रा. कश्मिरा दळी सहाय्यक प्राध्यापिका , भारतरत्न डॉ. पां.वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र , रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक आपल्याला सर्वांना फक्त आपल्या सभोवतालचे एक जग माहीत आहे , जे आपण आपल्या इंद्रियांनी पाहू शकतो , ऐकू शकतो , स्पर्श करू शकतो , चव घेऊ शकतो आणि वास घेऊ शकतो . विज्ञान आपल्याला या जगाच्या अनेक भागांविषयी सांगते जे आपल्या इंद्रियांच्याद्वारे ग्रहण करणे शक्य नाही . जे अतिशय सूक्ष्म असल्यामुळे डोळ्यांना दिसत नाहीत. आपल्या इंद्रियांवर परिणाम करण्यास अतिशय सूक्ष्म असे ते घटक आहेत. परंतु आज विज्ञान आपल्याला इंद्रियातीत असणाऱ्या अशा काही गोष्टींचा परिचय करून देते ज्या भौतिक जगतापेक्षा बाह्य नाहीत . त्या अदृश्य असल्या तरी जगाचाच एक भाग आहेत. भौतिक पदार्थांमध्ये एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेल्या घन पदार्थ , द्रव , वायू , बाष्प , आणि अवकाश या सर्व गोष्टींचा समावेश आहे. परंतु आपण दुसऱ्या जगाविषयी म्हणजे जे इंद्रियातीत असून या जगाचा भाग नाही...