🌸 🌸 हजारो वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेला भारत देश. याच परंपरेतील वेद,उपनिषदे, पुराणे, गीतेचे ज्ञान, कित्येक साहित्यकृती संस्कृत भाषेत आहेत. विविध अनुवाद आणि भाषांतराचे तंत्र वापरून संस्कृत ग्रंथातील ज्ञान सर्वसामान्यांना प्राप्त झालं. संस्कृत भाषा ही देवभाषा, गीर्वाणभाषा म्हणून सुप्रसिद्ध आहेच. त्यातच व्याकरणामुळे या भाषेला एक बांधेसूदपणा प्राप्त होतो. त्यातच शब्दभांडाराने संपन्न आणि साहित्य-शास्त्र-ज्ञान या तिघांचाही विपुल साठा असणारी अशी ज्ञानगंगा म्हणजे संस्कृत भाषा... मात्र बदलत्या शैक्षणिक पद्धतीबरोबर संस्कृत भाषेत करिअर करण्यास अथवा भविष्य घडवण्यास आता ‘सुगीचे दिवस’ आले आहेत. शालेय जीवनात संस्कृत भाषेशी मुलांची ओळख होते. कित्येक घरांमध्ये सकाळी देवपूजेच्या वेळेस अथवा सायंकाळी दिवेलागणीच्या वेळेला स्तोत्रे म्हटली जातात. यामुळे घरातील मुलांचा संस्कृत भाषेशी प्राथमिक स्वरूपाचा परिचय होतो. लहानपणीच मुलांच्या कोवळ्या मनावर संस्कृत भाषा अवघड नसून ती आत्मसात करण्यास सोपी आहे हा संस्कार होतो. त्यामुळे या भाषेकडे परीक्षेत गुण मिळवून देणारी भाषा ...