योगशास्त्र अध्ययनाच्या नव्या संधी


योगशास्त्र अध्ययनाच्या नव्या संधी

कु. कश्मिरा दळी

साहाय्यक प्राध्यापिका 

भारतीय दर्शन विभाग

क.का.सं.वि.

          


    तंत्रज्ञानाच्या युगात नवनव्या विद्याशाखांमध्ये अध्ययनाच्या संधी उपलब्ध होत आहेत. अशीच सध्या योगशास्त्र ही एक नवी विद्याशाखा म्हणून विकसित होत आहे. बदलत्या काळाबरोबर माणसाची जीवनशैलीही बदलते आहे. या बदलत्या जीवनशैलीबरोबर धकाधकीच्या जीवनात तारेवरची कसरत करत आपल्या जीवनाचा तोल सावरण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो आहे . या व्यस्त जीवनशैलीत दैनंदिन घडामोडींचा समतोल साधण्यात आपल्या जीवनाचा पाया असेल्या आपल्या शरीराकडे बरेचदा आपले  दुर्लक्ष होते. स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत हेळसांड केली जाते. परंतु शारीरिक, मानसिक स्वास्थ्य संतुलि राहावे यासाठी हल्ली प्रत्येकजण सजग झालेले आपण पाहतो आहोत. शारीरिक,मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योग ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. योग हा जणू मानवी जीवनाचा अविभाज्य घटकच होऊ पाहत आहे. देश विदेशातून योग शिकणाऱ्यांची आणि योग शिकून उद्योग करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण योगशास्त्र या विद्याशाखेविषयी आणि योगशास्त्र अध्ययन करून उपलब्ध होणाऱ्या संधीविषयी माहिती घेणार आहोत.

 

          योगशस्त्र विद्याशाखा – पूर्वी गिरिकंदरांमध्येच सामावलेली योगसाधना जीचे क्षेत्र केवळ संन्यासी,ऋषी मुनी यांच्यापर्यंतच मर्यादित होते. त्या योगसाधनेने आता एका नव्या विद्याशाखेच्या रूपात विस्तीर्ण दालन खुले करून दिले आहे. योग म्हटलं की केवळ विविधप्रकारच्या शारीरिक कसरती, आसने , मुद्रा, प्राणायाम अशा ठराविक गोष्टींचे चित्र नजरेसमोर येते. परंतु यापलीकडेही योगशाखेचा प्रचंड प्रपंच विस्तार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग,राजयोग, हठयोग ,मंत्रयोग यासारखी योगसाधनेची पुष्कळ अंगे आहेत. भारतीय दर्शनांपैकी योगदर्शन हे एक प्रमुख दर्शन होय. सध्या व्यवहारिक दृष्टीने योगाचे प्रस्थ विस्तारताना दिसत असले तरी या योगविद्येला पूर्वेतिहास आहे. शास्त्रशुद्ध बैठकीवर आधारलेले वैज्ञानिकतेच्या कसोटीवर पारखेलेले असे हे शास्त्र आहे. योगविद्या म्हणजे प्राचीन परंपरेचा हा अमूल्य ठेवा आहे. योग हे केवळ शरीर स्वस्थ ठेवण्याच्या माध्यमापूरतेच मार्यादित नसून व्यापक उद्योगक्षेत्र बनले आहे .ज्यात करियर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. अशा योगशाखेतील विविध अभ्यासक्रमांच्या  अध्यायनाद्वारे या काळाच्या हाकेला विश्वाच्या मागणीला साद देण्याची संधी आता दूर नाही.

 

योगक्षेत्राचे आकर्षण का वाढते आहे ?

          योग अध्ययनाने आपल्या जीवनात त्याचे नित्य आचरण केल्याने केवळ मानसिक स्वास्थ्य संतुलित राहते असे नाही तर आसन, ध्यान इत्यादींच्या सरावाने शरीरही स्वस्थ राहते. याच कारणामुळे युवा पिढी या क्षेत्राकडे आकर्षित होताना दिसते तसेच या क्षेत्रात योगा इंस्त्रक्टर म्हणून आपले करियर करू इच्छिते .

         

योगशास्त्रविषयक अभ्यासक्रम –

बी.ए. योगशास्त्र – पदवी

पात्रता           -        कोणत्याही शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या                        अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो.

कालवधी       -        ३ वर्षाच्या या अभ्यासक्रमात ६ सत्रांचा समावेश  आहे. प्रत्येक सत्राच्या                           शेवटी परीक्षा घेण्यात येते.

अध्ययन                   -        योगविषयक शास्त्रीय ग्रंथांचे अध्ययन, संस्कृत भाषेचे सामान्य ज्ञान,                              योगाच्या विविध उपशाखांचा परिचय, शास्त्रोक्त पद्धतीने योग                                    प्रात्याक्षिके.  

 

एम. ए. योगशास्त्र – पदव्युत्तर पदवी

पात्रता           -        कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या                                       अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो.

कालवधी       -        २ वर्षाच्या या अभ्यासक्रमात ४ सत्रांचा समावेश आहे. प्रत्येक सत्राच्या                            शेवटी परीक्षा घेण्यात येते.

अध्ययन        -        योगविषयक शास्त्रीय ग्रंथांचे अध्ययन, योग परंपरा, मानवी शरीरशास्त्र                              आणि शरीरविज्ञान,पातंजल योगसूत्र,योग तत्वज्ञान, निसर्ग उपचार                      पद्धती,शास्त्रोक्त पद्धतीने योग प्रात्यक्षिके.



 

योग अध्ययनाची आवश्यकता –

योगक्षेत्रात करिअर कारायचे असेल तर उत्तम वक्तृत्वाबरोबरच एका व्यक्तीपासून ते समूहातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत योग्य माहिती पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. योग प्रशिक्षक म्हणून कार्य करताना जसे प्रात्यक्षिक गोष्टींचे अचूक ज्ञान असायला हवे त्याच बरोबर आपण जी प्रात्यक्षिके करतो त्यांचे नियामांसह शास्त्रशुद्ध ज्ञानही असणे आवश्यक आहे. हे ज्ञान आपल्याला योगविषयक अभ्यासक्रमांच्या माध्यमातूनच प्राप्त होऊ शकते.

 


योगशास्त्राच्या अध्ययनानंतर विविध क्षेत्रात उद्योगाच्या संधी - 

योग ही एक वैज्ञानिक कला असून योग शिकण्यासाठी नेहमीच प्रशिक्षित शिक्षकाची आवश्यकता असते.

        योगशास्त्रात विषयात पदवी प्राप्त केल्यावर शैक्षणिकक्षेत्रात पुढे वाटचाल करावयाची           असल्यास एम.ए. योगशास्त्र या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पुढे प्रवेश घेता येतो. बी.ए, एम.एड करून शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षक होणे शक्य आहे.          नेट,सेट परीक्षा देऊन विश्वविद्यालयांमध्ये प्राध्यापक होता येते. संशोधनक्षेत्रात प्रगती      करावयाची असल्यास पीएचडी करून डॉक्टरेट मिळवता येते.

 

        योग शिक्षक बनून आपण स्वतःचे वर्ग अथवा केंद्र चालवू शकतो.

        योग शिक्षण संस्थांमध्ये योग शिक्षक म्हणून कार्य करू शकतो.

        योग प्रशिक्षण घेऊन योग अॅरोबिक्स इंस्ट्रक्टर, योग थेरापिस्ट, योग इंस्ट्रक्टर होता         येते.

        शासकीय शाळा, महाविद्याये, विश्वविद्यालये यांमध्ये योग शिक्षक होता येते.

        शासकीय रुग्णायांमध्ये योगा स्पेशालीस्ट म्हणून कार्य करता येते.

        और्वेदिक महाविद्यालये, रुग्णालयांमध्ये असिस्टन्ट आयुर्वेदिक डॉक्टर होता येते.

        संशोधक्षेत्र – आयुर्वेद आणि योग, औषधशस्त्र आणि योग, मानसशास्त्र आणि योग           यासारख्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या विषयांवर संशोधनात उत्तम संधी           आहेत.

        योग शिक्षण संस्था,रुग्णालये,जिम,शासकीय आरोग्य केंद्र,कॉर्पोरेट कंपन्या,योग केंद्रे           खाजगी व शासकीय संस्था इ.ठिकाणी कार्य करण्यास वाव आहे.

 

          भारता बरोबरच परदेशातही योगाची वाढती मागणी असल्याने आंतरारष्ट्रीय स्तरावरही उद्योगाच्या पुष्कळ संधी उपलब्ध आहेत.



Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature