हिंदू धर्मातील सामान्य संस्कार आणि आचार - भाग 2

 

 संस्कार


 प्रा. कश्मिरा दळी

           सहाय्यक प्राध्यापिकाभारतरत्न  डॉ. पां.वा. काणे 
       संस्कृत अध्ययन केंद्ररत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक



 



प्रत्येक धर्मामध्ये आपल्या अनुयायांसाठी काही संस्कार व आचार विहित केलेले असतात. संस्कार हा शब्द साधारणपणे पुढील अर्थांनी वापरला जातो () जीवावरील आवरण (कोश) शुद्ध करण्यात आणि विजय प्राप्त करवून देण्यात  मदत करणे; () त्याच्या सहाय्यासाठी उच्च बुद्धिमत्ता असलेल्या जसे की देव आणि ऋषींना त्याच्या पर्यंत पोहोचवणे; () त्याच्या सभोवतालचे वातावरण सुधारण्यासाठी आणि त्यामुळे त्याला मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता साधण्यास सौकर्य प्राप्त करवून देणे.  

या उद्देशासाठी भौतिक वस्तू, मुद्रा, आसने आणि शब्द यांचा वापर केला जातो, इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी काळजीपूर्वक सुव्यवस्थित अशी यांची मांडणी केली जाते.

विनियोग केल्या जाणाऱ्या वस्तू या त्यांच्या उत्तम आकर्षण शक्तीसाठी निवडलेल्या असतात, जसे की एखाद्या विशिष्ट देवतेस अर्पण करण्यात येणारी विशिष्ट फुले यांचे समर्पण यासाठी केले जाते की, पूजनीय वस्तू  उपासनेच्या उद्दिष्टाशी समान आकर्षण सामायिक करतात आणि त्यामुळे त्या उद्दिष्ट आणि उपासक यांच्यात एक दुवा निर्माण होतो. त्यामुळेच श्रीकृष्णाच्या उपासनेत तुळशीच्या मण्यांची माळ वापरली जाते; तर महादेवाच्या उपासनेत रुद्राक्षांच्या मण्यांची माळ वापरली जाते.

मुद्रा आणि आसने, बहुतांशी प्रमाणात शरीरात संचार करणाऱ्या प्राणावर प्रभाव टाकतात; काही मुद्रा शरीरातील आकर्षण शक्तीला आजूबाजूच्या वातावरणात निसटण्यापासून रोखतात आणि तिच्या प्रवाहांना शांत व स्थिर विचारासाठी योग्य अशा पद्धतीने प्रवाहित होण्यास प्रवृत्त करतात.

शब्दांचा वापर वरील सर्व तीन उद्दिष्टांसाठी केला जातो. हे शब्द कंपन निर्माण करतात, आणि हे कंपन नियमित व सम असल्यामुळे, सूक्ष्मशरीराचे कंपन - जे अत्यंत संवेदनशील व सहज प्रभावित होणारे असते  तेही नियमित व सम होते. जेव्हा सूक्ष्मशरीराचे हे कंपन नियमित केले जातात, तेव्हा जीवाला विचारांची एकाग्रता व भक्तीमध्ये मोठी सहाय्य प्राप्त होते. योग्य प्रकारचे शब्द (ध्वनी)  ऋषी व देवतांचे लक्ष त्या शब्द (ध्वनि) उच्चारणाऱ्या व्यक्तीकडे वेधतात, आणि ते त्याला सहाय्य करतात. याव्यतिरिक्त, योग्य ध्वनी दुष्ट बुद्धी व दुष्ट आकर्षक प्रभाव दूर करतात. अशाप्रकारे ध्वनी  हे उच्चारण करणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूचे वातावरण सुधारतात.

ध्वनींचा अशा प्रकारे जो वापर केला जातो, त्याला "मंत्र" असे म्हणतात. मंत्र हा ध्वनींच्या एका निश्चित अनुक्रमाचा समूह असतो, ज्यामध्ये ध्वनी विशिष्ट क्रमाने मांडलेले असतात; जर हे ध्वनी बदलले गेले, तर कंपनही बदलतात आणि त्याचे परिणामसुद्धा बदलतात. म्हणूनच मंत्राचे भाषांतर करता येत नाही. भाषांतरित मंत्र म्हणजे जणू शब्दामधील सर्व अक्षरांचे संकलन होय. ज्यामुळे त्यातून  कोणताच अर्थच निष्पन्न होत नाही.

 मंत्रांच्या बाबतीत लाखात ठेवण्यासाखी बाब म्हणजे जर मंत्रांचा उच्चार करणारी व्यक्ती उत्तम जीवन जगण्याचा प्रयत्न करत नसेल, तर मंत्राचे कंपन त्याच्या भल्याऐवजी त्याचे हानी करतात. कारण मंत्र जेव्हा त्याच्या सूक्ष्मशरीरावर कार्य करतात, तेव्हा त्या शरीरावर अशा शक्तीचा परिणाम होतो जो वाईट इच्छांशी आणि दुष्ट विचारांशी विरोध करतो; आणि त्यामुळे सूक्ष्मशरीराला तीव्र स्वरूपात हादरे बसू शकतात, आणि ते जखमी होऊ शकते किंवा फाटूही शकते. कारण त्या व्यक्तीच्या वाईट संकल्पांमुळे त्याचे सूक्ष्मशरीर एका दिशेने कंपन करते, तर मंत्राचे कंपन त्याला दुसऱ्याच दिशेने खेचतात. पण जर त्याचे संकल्प चांगले असतील, तर ते मंत्राच्या कंपनांसोबत कार्य करतात आणि कोणताही संघर्ष होत नाही. जरी ते संकल्प कमकुवत असले, तरी ते अडथळा न बनता सहाय्यच करतात.

मंत्र मोठ्याने म्हणण्याची आवश्यकता नसते आणि त्यांची मूक पुनरावृत्ती ही श्रवणीय पठणापेक्षा अधिक शक्तिशाली असते. कारण मंत्र स्थूल किंवा जड पदार्थांपेक्षा सूक्ष्म प्रकारच्या पदार्थांवर जास्त प्रभाव टाकतात.

हिंदू जीवनातील संस्कारांपैकी काही महत्त्वाचे संस्कार असे असतात, जे जीवनाच्या प्रमुख अवस्थांचे निदर्शनकरतात. प्राचीन काळात असे संस्कार अनेक होते, त्यापैकी दहा मुख्य मानले जात असत. मात्र आज त्या दहापैकी काहीच संस्कार प्रत्यक्षात पाळले जातात. या संस्कारांपैकी सात संस्कार शैशव व प्रारंभिक बाल्यावस्थेशी संबंधित असतात. या सात संस्कारांपैकी सहावा संस्कार अन्नप्राशन, म्हणजेच मुलाला प्रथम अन्न देणे. हा सार्वत्रिक पद्धतीने पाळला जातो; आणि सातवा संस्कार  चूडाकरण, म्हणजेच मुण्डन आणि त्यासोबत कर्णवेध.  हा ही जवळजवळ सर्वत्र केला जातो. त्यानंतर आठवा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार येतो तो उपनयन. या संस्कारात मुलाला गुरुकडे नेले जाते, जेथे गुरु त्याला यज्ञोपवीत देतो आणि गायत्री मंत्र शिकवतो. ही दीक्षा त्याला "द्विज" म्हणजेच द्वितीय जन्म प्राप्त करवून देते.

उपनयन हा जीवनातील छात्रावस्थेचा प्रारंभ मानला जातो, या काळात ब्रह्मचर्य म्हणजे पूर्ण ब्रह्मचारी जीवन  पाळण्याची आज्ञा असते, आणि त्या मुलाचे कर्तव्य म्हणजे मन लावून अध्ययन करणे. ही अवस्था औपचारिक समावर्तनाने म्हणजे गुरुकुलातून घरी परतण्याच्या विधीने  संपते, त्यानंतर तो जीवनातील दुसऱ्या अवस्थेत  म्हणजे गृहस्थाश्रमात  प्रवेश करण्यास तयार होतो.  दहावा संस्कार विवाह होय याने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश होतो, जो त्याच्या पुरुषत्वाच्या प्रारंभाचा व त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा सूचक असतो. आधुनिक भारतात जरी या आरोग्यदायी नियमांचे पालन कमी होत चालले असले तरी उपनयन व विवाह हे संस्कार विधी म्हणून टिकून राहिले आहेत. सध्या विवाह हा विद्यार्थ्याच्या जीवनामध्येच विसंगतपणे घुसवला जातो, आणि त्यामुळे बाल्यावस्था व गृहस्थ या दोहोंची कर्तव्ये यांच्यात होणाऱ्या संभ्रमामुळे दोघांना हानी पोहोचते.  प्राचीन नियमांचे  लवकरच पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे.

*****

(संदर्भ१९१६ साली Central Hindu College Banaras येथून प्रकाशित झालेल्या SANATAN DHARMA AN ELEMENTARY TEXTBOOK - OF HINDU RELIGION AND ETHICS या मूळ इंग्रजी पुस्तकातील अनुवाद क्रमशः...) 

Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature