ज्ञानाचे  पारसमणी 

भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे

निसर्गाने  मुक्त  उधळण  केलेला प्रदेश म्हणून ओळख असलेल्या कोकणाने देशाला ६ भारतरत्न दिले. याच कोकणातील व्यक्तिमत्वरुपी रत्नांचे कोंदण असलेली भूमी अर्थात रत्नागिरी.. याच रत्ननगरीच्या मातीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे....आदरणीय डॉ काणे यांनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर इंग्रजांच्या जुलमी आणि अन्यायाच्या दुष्काळात ज्ञानाची गंगा प्रवाहित केली. आज त्यांची पुण्यतिथी..   

आदरणीय डॉ. काणे यांचा जन्म ७ मे १८८० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम येथे झाला. आदरणीय डॉ. काणे यांचा चिपळूणच्या सरकारी शाळेपासून ते भारतरत्न पुरस्कारापर्यंतचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. याच महान विभूतीच्या सान्निध्यात ज्ञानाचा उत्कर्ष व्हावा यासाठी रत्नागिरी शहरात सर्वप्रथम कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे उपकेंद्र २०२१ साली सुरु झाले. रत्नागिरी उपकेंद्राची वास्तु ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी इ. सन १८६३ मध्ये शासकीय इंग्रजी माध्यमाची शाळा होती. याच शाळेत डॉ. काणे सन १९०४ च्या सुमारास काही काळ अध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे नररत्नांची खाण असलेल्या रत्नागिरीत स्थापन झालेल्या रत्नागिरी उपकेंद्राला भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे असे नाव मिळणे हा रत्नागिरीचाच यथार्थाने सन्मान म्हणावा लागेल. 

    आदरणीय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे कार्य सर्वसमावेशक आणि अत्यंत भरीव आहे. आदरणीय डॉ. काणे हे इंटरच्या परीक्षेत १८९९ साली उत्तीर्ण झाले आणि द्वितीय भाषा म्हणून संस्कृत मध्ये त्यांना सर्वोच्च गुणांसाठी पारितोषिक मिळाले. शिवाय एम. ए. संस्कृत आणि इंग्रजी आणि एल.एल.एम. ची परीक्षा १९१२ ची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. यानंतर आदरणीय डॉ. काणे हे आपल्या ज्ञानाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करू लागले. त्यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन त्यांचा सन्मान महामहोपाध्याय या पदवीने करण्यात आला. साहित्य, समाज सुधारणा, राजकारण, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत आदरणीय डॉ. काणे यांनी महनीय काम केले. यासाठी त्यांना १९६३ साली भारत सरकारकडून भारतरत्न या मोठ्या नागरी पुरस्काराने स्नामानीत करण्यात आले. यामुळे कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. आदरणीय डॉ. काणे यांच्या नावावर १९८ प्रकाशने आहेत ज्यात ३९ ग्रंथ, ११५ लेख, ४४ पुस्तक परिचय व परीक्षणांचा समावेश आहे. अशा या ज्ञान महर्षीनी १८ एप्रिल १९७२ रोजी देह ठेवला. 

श्री.स्वरूप काणे , समन्वयक, CDOE, रत्नागिरी

Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature