भारतीय कालगणनेविषयी थोडेसे..

 भारतीय कालगणना


    भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कालपरिभाषा मांडण्यात आली आणि वेगवेगळे नऊ कालमानांची संकल्पना पुढे आली या नवविध कालमानांमुळे काळाची सांगड  ब्राह्म, दिव्य, प्रजापत्य, बार्हस्पत्य, पैत्र्य, सावन, चांद्र, सौर आर्क्ष अशा नऊ वेगवेगळ्या मापांमधे बसवण्यात आली. त्यामुळे पूर्व वैदिक काळापासून पुढे अनंत काळापर्यंत काळ हा जवळपास अचूकपणे मोजता येऊ लागला. 

    सामान्य लोकांसाठी सण, व्रतांचे निर्णय चांद्र, सौर, सावन व नक्षत्र यांपासून निर्माण होणाऱ्या मानाने घेता येतात. त्यातही दैनंदिन उपयोगासाठी सौर, चांद्र व सावन मान वापरून पंचांगे तयार करण्यात येऊ लागली.

    ज्योतिषशास्त्रात कालगणना ही अविभाज्य घटक आहे. कारण कोणत्याही संस्कृतीचा उगम व तिची पाळेमुळे शोधण्याचे हे उत्कृष्ट साधन आहे. भारतात युधिष्ठीर संवत, विक्रम संवत, श्रीनृप शालिवाहन शक या काही प्रसिद्ध शक संवत्सर कालगणना आहेत.

अप्रत्यक्षाणि शास्त्राणि ,विवादस्तत्र केवलं । 

प्रत्यक्षं ज्योतिष शास्त्रं ,चन्द्रार्को यत्र साक्षिणौ ॥


- Mrs. Kalyani Dahale, KKSU.

Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature