कलिवर्ज्य

 

                                कलिवर्ज्य


 

कु. कश्मिरा राजेश दळी
सहाय्यक प्राध्यापिका,
क.का.सं.वि., रत्नागिरी उपकेंद्र
ई-मेल – kashmirad@kksu.org

र्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये विविध संकल्पनांचा ऊहापोह केलेला आपण पहातो कलिवर्ज्य ही त्यापैकीच एक संकल्पना होय. समाजामध्ये वावरणारा मनुष्य, विशिष्ट काळानुसार परिवर्तित होत जाणारे त्याचे आचरण, जीवनात घडणाऱ्या घटना, जीवनपद्धती, बदलणाऱ्या अवस्था दर्शविण्यासाठी आणि काळाचा बोध करवून देण्यासाठी पुराण कथांमध्ये कृत, त्रेता, द्वापर व कली अशी चार युगे मानली जातात. एका युगानंतर पुन्हा नव्याने त्यापुढील युगाचा आरंभ होतो अशी चक्राकार कालगती अनादीकाळापासून चालत आलेली असून अनंतकाळापर्यंत चालत राहील.

           युगाच्या कालमर्यादेनुसार मनुष्याचे आयुर्मान, धर्म, तेज, सामर्थ्य, सद्गुण आदिंचा निरनिराळ्या बाबतीत पूर्वीच्या युगापेक्षा नंतरच्या युगामध्ये क्रमशः ह्रास झाल्याचे दिसते. कृतयुग सर्वश्रेष्ठ पुण्यावंतांचे युग होते तर या उलट कलियुगात मनुष्यांचे पतन होते. कलियुगात काय काय घडून येईल याचे विविध धर्मग्रंथांमध्ये केलेले विवेचन सुपरिचितच आहे. पूर्वी आदर्श समाज अस्तित्वात होता. परंतु बदलत्या काळानुसार मनुष्याची निती, आरोग्य, आयुर्मान यांचा क्रमाक्रमाने ह्रास होत गेला. त्यामुळे पूर्वीच्या युगांमध्ये जे नियम लागू होते तेच नियम सध्याच्या काळात लागू होणार नाहीत.

           क्रमाने कृत, त्रेता युगामध्ये समाजात ज्या नियमांचे पालन केले जात होते त्यापैकी काही नियम तसेच्या तसे कालियुगामध्ये आचरणात आणता येत नाहीत. अशा कालियुगामध्ये लागू ना होणाऱ्या बहुधा जी कृत्ये निषिद्ध मानली आहेत. म्हणजेच वर्ज्य करण्यात आलेली आहेत अशा नियमांनाच कलिवर्ज्य असे संबोधले आहे. कलियुगात निषिद्ध मानलेली कृत्ये म्हणजे कलिवर्ज्य होत. (Kali-varjya - to be avoided in the present Kali age, obsolete.)  अतिप्राचीन धर्मग्रंथ, स्मृतीग्रंथ, सूत्रग्रंथ इत्यादींमध्ये एखाद्या नियमाचा उल्लेख केलेला असला तरी काही नियमांचे पालन करणे कलियुगात निषिद्ध मानले आहे. कलिवर्ज्य नियमांच्या यादीत सर्वसाधारणपणे ५५ नियमांचा उल्लेख केलेला आढळून येतो. आपण प्रस्तुत लेखामेच्या माध्यमातून या विषयाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. धर्मशास्त्राचे जाणकार आणि गाढे अभ्यासक भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी आपल्या History Of Dharmashastra या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडात प्रस्तुत संकल्पनेची सविस्तर चर्चा केलेली आहे. या ग्रंथाचा आधार घेऊन काही लेखांच्या माध्यमातून कलिवर्ज्य या संकल्पनेत समाविष्ट करण्यात आलेल्या ५५ नियमांपैकी काही कलिवर्ज्य कायदेशीर बाबींशी संबंधित, वाढत्या जातीविशिष्टतेमुळे, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत विवाहाबंधनाच्या पवित्रतेशी संबंधित, करुणा, न्याय व समानतेच्या संकल्पानावर आधारित, ब्राह्मणांच्या वाढत्या पवित्रतेशी व उच्च सामाजिक स्थानाशी संबंधित, स्वच्छतेच्यादृष्टीने सुचवण्यात आलेले तर पाप, प्रायश्चित्त आणि औपचारिक शुद्धता व अशुद्धता यासारख्या कठोर कल्पनांमधून उद्भवलेल्या अशा निरनिराळ्या विषयांशी संबंधित नियमांचा थोडक्यात आढावा या लेखाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.



 


 



Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature