हिंदू धर्माच्या मुलभूत संकल्पना
हिंदू धर्माच्या मुलभूत संकल्पना
प्रा. कश्मिरा दळी
सहाय्यक प्राध्यापिका, भारतरत्न डॉ. पां.वा. काणे
संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक
१. एक अस्तित्व
एकमेव अनंत, शाश्वत, अपरिवर्तनीय,
असे अस्तित्व सर्वत्र आहे. ज्याच्यापासूनच
सर्व उत्पन्न होते आणि ज्यात विलीन होते.
"One only, without a second" [1]*
जे काही होते, आहे आणि असू शकते अशा सर्वांना ते
स्वतः मध्ये समाविष्ट करून घेते. समुद्रामध्ये जशी लाट उसळते
आणि पुन: समुद्रात विलीन होते त्याचप्रमाणे हे विश्व समग्रातून उदयाला
येते आणि पुनः समग्रामध्ये लय पावते. समुद्र म्हणजेच पाणी आणि समुद्रात उत्पन्न होणाऱ्या
लाटा या त्याचेच रूप किंवा प्रकटीकरण होत. नक्कीच एकमेव अस्तित्व
आहे. संपूर्ण विश्व हे त्याच अस्तित्वाचे रूप किंवा प्रकटीकरण
आहे. "हे सर्व ब्रह्मच आहे." [2]
हेच धर्माचे प्राथमिक सत्य आहे. मानवाने त्या सर्वांना निरनिराळी
नावे दिलेली आहेत. सनातन धर्माने याला नाव दिले ब्रह्म.
इंग्रजी भाषिकांनी याला गॉड असे संबोधले. याचाच अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यात भर
घालण्यासाठी, त्याचा स्वतःचा स्वभाव स्पष्टपणे कळावा यासाठी
कधी कधी हिंदू या समग्राला निर्गुण, गुणधर्माशिवाय असलेले, अमर्याद आहे असे म्हणतात. ब्रह्माच्या अव्यक्त
अवस्थेचे वर्णन यातून निदर्शनास येते. अव्यक्तावस्थे पेक्षा
व्यक्त अवस्था भिन्न आहे हा फरक समजावण्यासाठी व्यक्तावस्थेत ब्रह्माला सगुण ब्रह्म असे संबोधले जाते. यात ते गुणांसह, गुणधर्मांनीयुक्त, मर्यादित असे परम ईश्वर स्वरुपात असल्याचा आपला विश्वास असतो.
यालाच "ब्रह्माच्या दोन अवस्था म्हणतात;"
*[3] हा विषय तसा मुलांना समजण्यास
क्लिष्ट असून, सगुण
ब्रह्म म्हणजे त्याच निर्गुण ब्रह्माचे प्रकटीकरण आहे. ब्रह्म नव्हे, तर
एकमेव, सर्वांचा महान स्वामी, विचार व आनंद स्वरूपात असलेले ब्रह्मच प्रकाशमय होत असते. एवढे समजणे ही पुरेसे आहे. ते स्वतः अस्तित्वात
आहे, सर्व भूतमात्रांचे तेच मूळ आहे. यालाच काही वेळा पुरुषोत्तम, परमात्मा, आत्मा असे म्हटले जाते. तो स्वतः आत्माच सर्वांची दुसरी बाबू
स्वतः पासून प्रकट करतो. यालाच मूल प्रकृती म्हणजेच जड पदार्थांचे मूळ म्हटले जाते. प्रकृती, जड पदार्थ असून तीच रूप
धारण करते आणि सर्व प्रकाराच्या आकाराच्या शरीरांना उत्पन्न करते. आपण ज्याला स्पर्श करू शकतो, चव घेऊ शकतो, गंध ग्रहण करू शकतो, पाहू शकतो, ऐकू शकतो हे सर्व जड पदार्थच होत आणि
याशिवाय बरेच काही आहे. जे समजून घेण्याइतपत आपली पंच ज्ञानेंद्रिये विकसित झालेली नाहीत.
रसायनशास्त्रातील घन पदार्थ, द्रव पदार्थ आणि वायू हे जडापासूनच बनलेले असताता. आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्ठी, दगड, झाडे, प्राणी, माणसे हे सारे
त्या जड पदार्थापासूनच बनलेले आहेत. परंतु त्यापैकी संपूर्ण जड पदार्थ नसून ऐकू न येणारा, अदृश्य, गंधरहित, चवरहित, अमूर्त असा, जो
आत्मा प्रत्येकामध्ये आहे. तो त्या ईश्वराचाच अंश आहे.
मूर्त स्वरूपात वस्त्र धारण करावे त्या प्रमाणे आत्म्याला धारण करणाऱ्या
त्या जड पदार्थालाच आपण शरीर किंवा कोष
किंवा उपाधि अशा संज्ञांनी संबोधतो. म्हणूनच ईश्वर हा सर्वांमध्ये विद्यमान आहे. आणि
तोच सर्वांना जीवन प्रदान करणारा आहे. तो आत्मा स्वयं अमर,
अंतर्मनाचा शासक, सर्वांमध्ये राहणारा ज्याच्याशिवाय
काहीही अस्तित्वात येऊ शकत नाही. पदार्थांनी बनलेल्या या शरीरात
त्याचा जो अंश आहे त्यालाच जीव, जीवात्मा, स्वतंत्र आत्मा असे म्हटले जाते.
आत्मा आणि पदार्थ यात अतिशय महत्वाचे असे काही भेद आहेत. त्या भेदांविषयी बोलत असताना असे म्हटले जाते की, जेव्हा इंद्रिये पूर्णपणे विकसित होतात तेव्हाच ती पदार्थ जाणून घेऊ शकतात.
जेव्हा ती इंद्रिये आत्म्याला जाणू शकत नाहीत, आणि तो आत्मा निराकार असतो तेव्हाच पदार्थ रूप धारण करतात. तो आत्मा आहे जो जीवन आहे. जो विचार करतो,
अनुभव घेतो, निरीक्षण करतो तोच
"मी" या स्वरुपात प्रत्येकामध्ये
विद्यमान आहे. तो आत्मा एक आहे. प्रत्येकामध्ये
आणि प्रत्येक वस्तूमध्ये आहे. परंतु पदार्थ (Matter) विचार करू शकत नाही अनुभव घेऊ शकत नाही, किंवा निरीक्षण करू शकत नाही. पदार्थ जड म्हणजेच
जाणीव नसलेला असा आहे. आणि त्या पदार्थांची सतत स्वतःला अनेक
रूपांमध्ये विभाजित करून अनेक रूपांत येण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळेच आत्मा (Spirit) आणि पदार्थ
(Matter) यांना परस्पर विरोधी आहेत असे म्हटले जाते. आत्मा हा जाणकार आहे. जाणणारा (knower)
तर पदार्थ म्हणजे ज्ञानाची वस्तू आहे. जे
जाणण्याजोगे आहेत.
विद्यार्थ्यांनी हे भेद जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आत्मा आणि पदार्थ या दोहोंमध्ये कधीही गोंधळून जाऊ नये. ते परस्पर विरुद्ध आहेत. आत्मा आणि पदार्थ या
'परस्पर विरोधी युग्मा पासूनच हे विश्व निर्माण झाले आहे.
जसे सत् - अस्तित्व, स्थिती,
चित- विचार शक्ती, आनंद - परमानंद स्वरुप आहे. हे आत्म्याचे तीन गुण आहेत. तसेच तम-रज- सत्व अनुक्रमे जडत्व, गतिशीलता, लयबद्धता पदार्थाचे तीन गुणधर्म आहेत. जडत्व पदार्थाला प्रतिकारशक्ती स्थिरता प्रदान करते तर गतिशीलता पदार्थाला
संक्रिय आणि भ्रमणशील ठेवते. लयबद्धता पदार्थाच्या हालचाली
नियमित करण्याचे कार्य करते. आपण कदाचित असे म्हणू की,
“ दगड स्वतः हलत नाही.” परंतु विज्ञान आपल्याला
असे सांगते की, दगडामध्ये असलेले जे सामान्य
दृष्टीने दिसू शकत नाहीत असे अत्यंत सूक्ष्म कण वेगाने आणि नियमितपणे इकडे - तिकडे
फिरत असतात. वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास ते कंपन पावत
असतात.
शक्ति किंवा ईश्वराची दैवी शक्ति जीच्यामुळे पदार्थ (Matter) रूप धारण करण्यास आरंभ करतात त्या शक्तीलाच 'माया'
म्हणतात. किंवा काही वेळा तीला दैवी प्रकृति
असे ही म्हणतात. दैवी प्रकृति विषयी बोलताना श्रीकृष्ण म्हणतात.
" जिच्यायोगे सर्व जग धारण केले जाते, ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृति समज." * [4](अचेत प्रकृतिपेक्षाही ही श्रेष्ठ आहे.)
ईश्वर आणि मूलप्रकृति एकमेकांसमोर उभे असून ईश्वराची दैवी शक्ती मूलप्रकृतीवर
प्रकाशित होत आहे आणि गुण निर्माण होत आहेत. ज्या गुणांपासून
एकमेकांवर झालेल्या कार्य प्रभावामुळे अनेक रूपे दिसू लागतात. प्रकृति आणि ईश्वर या परस्पर विरुद्ध युग्माच्या बाबतीत विद्यार्थी असा
विचार करू शकतात. याच दैवी शक्तीला माया म्हणतात. आणि म्हणूनच ईश्वराला या मायेचा (शक्तीचा)
अधिपती म्हटले जाते.
युवा विद्यार्थ्यांनी ही नावे त्यांचे अर्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण याशिवाय भगवद्गीतेची शिकवण समजून घेता येणार नाही. जी की, प्रत्येक हिंदू व्यक्तीने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मूलप्रकृति त्या शब्दा ऐवजी सामान्यपणे प्रकृती हाच शब्द वापरला जातो. मूलप्रकृति शब्दातील मूल हा मूळ उपसर्ग सहसा सोडून दिला जातो असे म्हणणे योग्य ठरेल.
(संदर्भ: १९१६ साली Central Hindu College Banaras येथून प्रकाशित झालेल्या SANATAN DHARMA AN ELEMENTARY TEXTBOOK - OF HINDU RELIGION AND ETHICS या मूळ इंग्रजी पुस्तकातील अनुवाद क्रमशः...)
****
[1] * छांदोग्योप,VI,ii- १
[2] छांदोग्योप, III, xiv – I विश्वाला उद्देशून प्रयुक्त करण्यात आलेली संज्ञा
[3] बृहदारण्यकोप, II,iii – १
[4] * भगवद्गीता, vii – ५


Comments
Post a Comment