पुनर्जन्म
पुनर्जन्म
प्रा. कश्मिरा दळी
सहाय्यक प्राध्यापिका, भारतरत्न डॉ. पां.वा. काणे
संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक
मागील भागात आपण जीवाच्या क्रमाने होणाऱ्या विकासाबद्दल चर्चा केलीच आहे.
जीवाचे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणे जस जसे शक्तींचे प्रकटीकरण
होते तसतसे शरीरात सुधारणा होणे यालाच पुनर्जन्म पुनः अवतरणे, देहांतरप्राप्ती म्हटले जाते. पुनर्जन्म या शब्दाचा शब्दश:
अर्थ पुनः देह धारण करणे, पुन: भौतिक शरीरात येणे असा होय. देहांतरप्राप्ती या शब्दाचा
अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नवीन शरीरात जाणे. दोन्ही
शब्द त्याच समान अर्थाने वापरले जातात. या शब्दांद्वारे वर्णित करण्यात आलेल्या प्रक्रियेचे विवेचन काय आहे
ते पाहूया.
जीव हा ब्रह्माचा एक अंश आहे. जीव हा माझाच अंश आहे असे
श्रीकृष्ण म्हणतात. त्याच्यात ब्रह्माचीच मूळ शक्ती आहे आणि तो
ब्रह्मच आहे. म्हणूनच "तू तोच आहेस"
असे श्रुती सांगते. परंतु त्यात स्थळ आणि काळ
यांचा भेद आहे. जसे बीज हे झाडापेक्षा वेगळे आहे. झाडच बीज उत्पन्न करते, त्याला स्वतःचे रूप प्रदान करते.
बीज जमिनीवर टाकले जाते. आपल्यातील शक्ती जोपर्यंत
पूर्णपणे बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपल्या प्रकृतीप्रमाणे ते वाढते आणि एक दिवस झाडासारखे
बनते. मूळ प्रकृती ही वनस्पतीची असल्याने ते अन्य काही बनू शकत
नाही. याचप्रमाणे जीवाच्या बाबतीतही घडते ईश्वर जीवाला बीजाप्रमाणेच
भौतिक पदार्थांमध्ये टाकतो. आणि त्याच्यातील सुप्त शक्तींचे जोपर्यंत
जागरण होत नाही तोपर्यंत म्हणजेच तो ईश्वर होईपर्यंत विकसीत होतो. तो अन्य काहीच बनू शकत नाही कारण त्याचा स्वभाव हा त्याच्या जन्मदात्याप्रमाणेच
ईश्वराप्रमाणेच असतो.
ईश्वराला ज्ञानी आणि
सामर्थ्यवान तर जीवाला अज्ञानी आणि शक्तीहीन म्हटले जाते. [1]*
परंतु जीव आपल्या सामर्थ्याच्या बळावर आपले ज्ञान वाढवू शकतो यालाच विकासाचा
क्रम म्हटले जाते.
आपण पाहिले आहे की जीव खनिजांच्या साम्राज्यातून
आपली विकासाची यात्रा आरंभ करतो आणि पुढे वाटचाल करत भौतिक जगावर अधिकार मिळवतो. या स्थितीपर्यंत तो बाह्य जगाविषयी अनभिज्ञ असतो.
त्याच्या समस्त क्रिया बाह्य जगातील आव्हाहने पेलण्यात व्यग्र असतात.
भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन,
त्सुनामी इत्यादिंचा सामना करत असताना आपण एकटे नसून बाहेरही कोणतीतरी
शक्ती आहे जी आपल्या अस्तित्वाचा बोध करवून देत असल्याचा त्याला प्रत्यय येतो. विद्यार्थ्यांनी
जर पृथ्वी संबंधित ऐतिहासिक घडामोडींचा मागोवा घेतला तर अगदी सुरुवातीच्या काळात जीवांना
अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत असल्याचे समजते. या
सर्व गोष्टी जीवांना जागृत करण्यासाठी आवश्यक होत्या. पुढे जाऊन
काही काळाने त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक परिवर्तने घडून खनिजांपेक्षा मऊ आणि अधिक लवचिक तंदुरुस्त शरीरे प्राप्त होण्यासाठी पुरेसे
जागृत झाले आणि ते वनस्पतींमध्ये गेले, तर इतरांनी, ईश्वरापासून पुढे येऊन खनिजांच्या राज्यात त्यांची जागा घेतली.
वनस्पतींमधील जीव बाह्य जगाबद्दल जसे
सूर्याचा प्रकाश, मंद वारा,
जीवनदायी वर्षा याबाबत अधिक सजग झाले.
जसजसे ते विकसित होत गेले तसतसे अधिक संवेदनशील झाले आणि त्यांनी
दीर्घायुषी वनस्पतींमध्ये जसे झुडुपे आणि झाडे यांमध्ये प्रवेश केला
त्यानंतर कमी प्राणशक्तीने युक्त जीव खनिजांच्या रुपात, त्याहीपेक्षा अधिक प्राणशक्तीने युक्त जीव पशुंच्या रुपात विकसित झाले.
पशुजीवनाचा उत्तरोत्तर विकास झाला कारण
अन्नासाठी शिकार करणे, परस्पर स्पर्धा व संघर्ष,
बुद्धिचातुर्य, मानसिक शक्तींचा विकास होत गेला. जीवाचा विकास
केवळ पशुजीवनापुरताच मर्यादित राहीला नाही तर पुढील विसासाच्या दृष्टीने मानवाचा आविर्भाव
होणे आवश्यकच होते.
विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडू शकतो
की, जीवाचा विकास कसा होतो
? याचे उत्तर असे की, जीवांचा विकास हा त्यांच्या
स्वतःच्या प्रयत्नानेच होत असतो. त्याच्या भोवती असलेल्या
पदार्थ आणि तत्वांनी वेढलेल्या भिंतीला तो
भेदू इच्छितो. बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याची बाहेर पाहण्यासाठी कार्यरत झालेली उर्जा या पदार्थ आणि तत्त्वांनी
वेढलेल्या भिंतीवर कार्य करते, आणि हळूहळू, डोळे विकसित होतात; अशाप्रकारे सर्व इंद्रिये आणि अवयव
विकसित होतात. परिस्थितीनुसार तो स्वतःला साजेसा आकार घेतो,
जेणेकरून तो आपल्या सर्व शक्तींचा बाह्य जगात उपयोग करू शकेल.
यामध्ये देवता त्याला मदत करतात. तो पाहण्याचा
प्रयत्न करतो तेव्हा अग्नि त्याला आपल्या शक्तीतील
उज्वलता प्रदान करतो जेणे करून त्याची दर्शन शक्ती विकसित होईल आणि बाह्य जगातील प्रकाश
जेव्हा त्याच्यावर पडेल तेव्हा तो पाहण्यास जीव सक्षम होईल. याप्रमाणेच
जेव्हा जीव चव घेऊ इच्छितो त्यावेळी वरुण त्याला आपल्या शक्तीपैकी जल तत्त्वाचा अंश
प्रदान करतो ज्यामुळे चव घेणे शक्य होते. याच क्रमाने अन्य इंद्रियांचा
उत्तरोत्तर विकास होतो. या प्रकारे तो आकार घेतो आणि हे विकसित
शरीर ठराविक अशा सीमेपर्यंत पोहोचल्यावर पुढे त्या शरीराचा उपयोग नाही असे जाणवल्यावर
त्या शरीराचा त्याग करून जीव दुसरे शरीर धरण करतो. तो जसजसा पुढे
जातो तसतसा जलद आणि वेगाने विकसित होतो कारण आपल्या शक्तींचा उपयोग केल्याने विकासाची
गती वाढते. मुक्तपणे कार्य होत असल्यामुळे पूर्वीच्या टप्यातील
परीणामापेक्षा जलद परिणाम साधणे शक्य होते.
ही विकासाची सामान्य प्रक्रिया आहे. विद्यार्थ्याला मुख्य कल्पना समजण्यासाठी उत्तरोत्तर
विकासाची ही निरंतर प्रक्रिया आहे असे सांगितले जात असले तरी नैसर्गिक
सामान्य प्रवाह पुढे चालू असताना या मार्गात अनेक लहान-मोठे चढ-उतार, परिवर्तने होत असतात.
जर जीवाने आपल्या शक्तीचा पूर्णपणे विनियोग केला नाही तर आहे त्या ही
स्थितीपेक्षा खालच्या टप्यात तो पोहोचतो. जसे शाळकरी विद्यार्थी.
जर तो निष्क्रिय असेल तर त्याला पुन्हा खालच्या वर्गात टाकले जाऊ शकते.
काही जीव मनुष्य जन्माच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेला असूनही निम्न स्तरातील
प्राण्याशी किंवा वनस्पती, दगड, अतिशय तामसिक वृत्तीचा असला अगदी दगडासारखा असला तरी, जोपर्यंत तो जीव मानवी स्वरूपाचा योग्य प्रकारे उपयोग करू शकत नाही तोपर्यंत
तो तुरुंगात असलेल्या कैद्यासारखा असतो. जो समाजापासून दूर गेलेला
आणि स्वातंत्र्याच्या
अभावी तो त्याच्या शक्तींचा वापर करू शकत नाही.
पण जीव हा जन्म-मृत्यूच्या चक्रात
कायमचा बांधला जाऊ शकत नाही. त्याला या जन्म -मृत्यूच्या चक्राला बांधून ठेवणारी दोर ही त्याची इच्छा असते. जोपर्यंत त्याला या भूतलावरील वस्तूंची इच्छा आहे, तोपर्यंत
या वस्तूंचा उपभोग आणि आनंद घेण्यासाठी त्याला या भूतलावर
परत यावेच लागते. पण जेव्हा तो या वस्तूंची इच्छा करणे सोडतो,
तेव्हा ते आशेचे दोर तुटतात आणि तो जीव मुक्त
होतो. मग त्याला यापुढे जन्म घेण्याची आवश्यकता नसते.
तो मुक्तीपर्यंत पोहोचतो. मुक्त जीव असे संबोधले
जाते.
बहुतेकदा मुक्त जीव हे इतर जीवांच्या
प्रगतीसाठी आणि त्यांना लवकर मुक्ती मिळावी याकरिता सहाय्य करण्यासाठी या जगात राहतात. अशा
मुक्तांबद्दल आपण वेद, पुराणे आणि इतिहासात वाचतच असतो;
कधी ते महान ऋषी किंवा राजे असतात, तर कधी ते अगदी
सामन्य लोक असतात. पण त्यांचे बाह्य
रूप काहीही असले तरी ते शुद्ध आणि निस्वार्थी आणि शांत असतात आणि फक्त इतरांना मदत
करण्यासाठी ते जीवन व्यतीत करत असतात. ते जगाच्या कल्याणासाठी
कार्य करण्यात समाधानी असून आपण ईश्वराशी एकरूप झालेले असतात.
(संदर्भ: १९१६ साली Central Hindu College Banaras येथून प्रकाशित झालेल्या SANATAN DHARMA AN ELEMENTARY TEXTBOOK - OF HINDU RELIGION AND ETHICS या मूळ इंग्रजी पुस्तकातील अनुवाद क्रमशः...)
*****
Comments
Post a Comment