सनातन धर्म

 


सनातन धर्म 

प्रा. कश्मिरा दळी
सहाय्यक प्राध्यापिका,  भारतरत्न  डॉ. पां.वा. काणे 
संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक   


    प्रस्तावना -

मङ्गलं दिशतु नो विनायको मङ्गलं दिशतु नः सरस्वती |
मङ्गलं दिशतु नः समुद्रजा मङ्गलं दिशतु नो महेश्वरी ||

 

सनातन धर्म म्हणजे शाश्वत धर्म, प्राचीन धर्मशास्त्र होय. ते  वेदांवर आधारित आहे, हे पवित्र ग्रंथ मानवजातीला अनेक युगांपूर्वी दिले गेले होते. या धर्माला आर्य धर्म असेही म्हणतात, कारण हा धर्म आर्य वंशातील समुदायाला दिला गेला होता; आर्य म्हणजे उदात्त, आणि हे नाव त्या महान वंशाला दिले गेले जे जगाच्या इतिहासात आधी आलेल्या वंशांपेक्षा स्वभावाने आणि रूपाने अधिक श्रेष्ठ होते. या लोकांचा पहिला परिवार हा सध्याच्या भारत देशाच्या उत्तर भागात स्थायिक झाला होता, त्यांनी प्रथम वस्ती केलेला भाग आर्यावर्त  या नावाने ओळखला जाऊ लागला, कारण या आर्यांची वस्ती या प्रदेशात होती. “पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत, या दोन पर्वतांदरम्यानचा जो प्रदेश आहे, (हिमालय व विंध्य) यालाच विद्वानांनी आर्यावर्त असे संबोधले आहे.”

नंतरच्या काळात या धर्माला हिंदू धर्म असे नाव मिळाले, आणि आजही तो प्रामुख्याने याच नावाने ओळखला जातो. आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व धर्मांपैकी हा सर्वात प्राचीन धर्म आहे. आपण या विषयी जितके अधिक जाणून घ्याल तितका आपण त्याचा अधिक सन्मान कराल आणि त्यावर अधिक प्रेम कराल, आणि तुम्ही या धर्मात जन्माला आल्याबद्दल अधिक कृतज्ञ व्हाल. परंतु हा धर्म तेव्हाच उपयोही येईल जेव्हा तुम्ही स्वतःला या धर्मासाठी उपयुक्त आणि योग्य व्हाल. अन्यथा हा महान धर्म आपले काहीही कल्याण करू शकणार नाही.    

सनातन धर्माची आधारशीला

प्राचीन धर्माची उभारणी ही एका दृढ पायावर झालेली आहे. आणि त्यावरच या धर्माची आधारशीला उभी आहे.

या पायालाच "श्रुति" म्हणून ओळखले जाते. श्रुति म्हणजे "जे ऐकले आहे";

आणि त्यावर उभारलेल्या भिंती "स्मृती" म्हणून ओळखल्या जातात, म्हणजे "जे स्मरण केले गेले आहे".
आणि आपण ती आजही कोणत्याही वैदिक पाठशाळेत म्हणताना ऐकू शकतो.
जे ज्ञान धर्माचा पाया असून मानवाला या चार वेदांद्वारे देण्यात आले आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद  हे चार वेद होत. प्रत्येक वेदाची विभागणी ही  तीन भागांमध्ये झालेली आहे ती याप्रमाणे -
परंतु आज खरे प्राचीन तंत्र फार थोडे शिल्लक राहिले आहे, कारण भविष्यातील पिढीमध्ये आध्यात्मिक विकासाचा ह्रास होणार असल्याने त्यांची अनुपयुक्तता  जाणून हा भाग सुरक्षित ठेवला नाही. तरीही  आज काही तांत्रिक स्वरूपाचे विधी वैदिक कर्मकांडा अंतर्गत, स्वतंत्र पूजेमध्ये यज्ञानुष्ठानामध्ये    वापरले जातात. तंत्र या नावाने आज उपलब्ध असलेली पुस्तके सामान्यतः वेदाचा भाग मानली जात नाहीत.
हिंदू समाज या नियमांवर आधारलेला आहे आणि त्याच नियमांद्वारे शासित होतो.
हे स्मृति ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत:-
तत्कालीन लोक, परंपरा, रीतीरिवाज, जीवनशैली, कला, सभ्यता इत्यादीबद्दल माहिती देतात. या ग्रंथांच्या वाचनाने आपला भारताची महत्ता तर समजतेच शिवाय या पुढे आपल्या भारत देशाला पुन्हा महान बनवण्यासाठी आपल्याला योगदान देणे आवश्यक असल्याची जाणीव होते.
त्याच प्रमाणे या धर्माने एक उज्वल वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानात्मक साहित्यपरंपरा निर्माण केली आहे.
आणि विभक्त झालेल्या मानवी आत्म्यांना परमात्म्याशी पुन्हा एकरूप होण्यास सक्षम करणे.
लक्ष्य प्राप्ती पर्यंत पोहोचण्याचा या सर्वांचा एक मार्ग होता. तो म्हणजे ज्ञानाचा विकास. या दर्शनांमध्ये साधकाच्या मानसिक क्षमतेनुसार विविध मार्ग सांगितले आहेत. वस्तुतः हे सर्व मार्ग निरनिराळे असले तरी एकाच गावी, म्हणजेच अंतिम सत्याकडेच, नेतात. षड्दर्शनांमध्ये काय समाविष्ट आहे, हे मुलांसाठी इतके जाणून घेणे पुरेसे आहे.
आणि दोहोंतील संबंध काय आहे हे स्पष्ट करते.

 श्रुती अतिशय ज्ञानी पुरुषांद्वारेदिल्या गेल्या, ज्यांनी देवांकडून त्यांचे श्रवण करून त्या प्राप्त केल्या. हे पवित्र असे ज्ञान अलीकडच्या काळापर्यंत कोठेही ग्रथित करण्यात आलेले नव्हते.

परंतु त्यांचे मनःपूर्वक अध्ययन आणि सतत पठण केले जात होते.

गुरु आपल्या शिष्यांना या श्रुतीचे गान करून दाखवीत असत, त्यानंतर शिष्य त्याचे अनुकरण करीत, अशाप्रकारे पूर्णपणे शिकेपर्यंत त्या पुन्हा पुन्हा म्हणत असत. आजही मुले श्रुती तशीच शिकतात, जशी त्यांच्या पूर्वजांनी फार प्राचीन काळात त्यांच्या पूर्वजांकडून शिकली होती,

श्रुती म्हणजे चार वेद होत. 'वेद' म्हणजे ज्ञान, जे ज्ञात आहे.

1.     मंत्रः किंवा संहिता

2.     ब्राह्मण

3.     उपनिषद्

मंत्र किंवा संहिता म्हणजे विशिष्ट पद्धतीने क्रमबद्ध केलेल्या रचना ज्या वाक्यामधील   अक्षरांच्या उच्चारणामुळे विशेष शक्ती आणि प्रभाव उत्पन्न होतो. देवतांसाठी स्तुती स्वरुपात गायलेल्या या ऋचा आणि यांचा मानवाशी असलेल्या सहसंबंध याचा  अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. जेव्हा हे मंत्र योग्यरित्या शिक्षित व्यक्तींकडून अचूक उच्चारले जातात, तेव्हा त्याचे विशिष्ट असे प्रभावी फळ प्राप्त होते. या मंत्रांचा विनियोग धार्मिक विधींमध्ये केला जातो आणि त्या विधीचे महत्त्व हे प्रामुख्याने मंत्रांच्या अचूक पठणावर अवलंबून असते.

ब्राह्मण भागामध्ये विधीविषयक निर्देश समाविष्ट असतात, पहिल्या भागामध्ये दिलेल्या मंत्रांचा विनियोग करून विधी कसे करावेत याचे स्पष्टीकरण यात दिलेले असते, याशिवाय, त्यांच्याशी संबंधित कथानकांचे विवेचनही यात आढळते.

उपनिषद भागामध्ये गूढ दार्शनिक सिद्धांतांचे विवेचन केले गेले आहे. ज्यामध्ये ब्रह्मस्वरूप, परमात्मा आणि जीवात्मा, मानव आणि विश्व, बंधन आणि मोक्ष इत्यादी  गूढ तत्त्वज्ञानात्मक विषयांचे विवेचन यात केलेले आहे. हे तत्त्वज्ञानाचे मूळ आहे. सज्ञान व्यक्तींना हे ज्ञान सहज समजू शकते.

प्राचीन काळात वेदाचा एक चौथा भागही होता, ज्याला कधी कधी उपवेद किंवा तंत्र म्हणत असत; या भागामध्ये विज्ञान व त्यावर आधारित व्यावहारिक शिक्षण यांचा समावेश होता.

श्रुतीमध्ये जे काही आढळते तेच सर्वोच्च प्रमाण मानले जाते, आणि सनातन धर्माच्या प्रत्येक श्रद्धावान अनुयायाद्वारे अंतिम मान्यतेस पात्र ठरते. सर्व पंथ, सर्व तत्त्वज्ञान प्रणाली, कोणत्याही वादाच्या निर्णयासाठी श्रुतीलाच अंतिम प्रामाण्य म्हणून स्वीकारतात.

स्मृती किंवा धर्मशास्त्र हे श्रुतीवर आधारित असून, श्रुतीनंतर प्रमाण्यामध्ये द्वितीय प्राधान्य यांना दिले जाते, यामध्ये महान ऋषींनी लिहिलेल्या चार ग्रंथांचा समावेश आहे, ज्यांचे मुख्य विषय म्हणजे – वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाच्या व्यवहारासाठीचे नियम व विधाने होत.

1.     मनुस्मृति,

2.     याज्ञवल्क्यस्मृति,

3.     शंखलिखितस्मृति,

4.     पराशरस्मृति  

 

यातील  सर्वांत पहिला ग्रंथ हा मनुद्वारे संकलित केलेली आर्य धर्मशास्त्राची मुख्य संहिता आहे, आणि मनू हा आर्य जातीतला महान विधाता मानला जातो. हिंदू कालगणना जगाच्या इतिहासाला सात महान कालखंडांमध्ये विभाजित करते, ज्यापैकी प्रत्येक  कालखंडाचा  प्रारंभ आणि अंत हा एखाद्या मनूपासूनच होतो, म्हणून त्याला मन्वंतर  म्हणजेच "दोन मनुंमधील कालखंड" - असे म्हणतात.

या क्रमाने प्रत्येक कालखंडात दोन मनू होऊन गेले आणि आतापर्यंत या मनूच्या वंशातले, स्वयंभूंचे वंशज असलेले, अत्यंत महान बुद्धिमान व तेजस्वी असे सहा मनु पृथ्वीतलावर अवतरले त्यांनी  सृष्टी निर्माण केली आहे. प्रत्येक मन्वंतरासाठी दोन मनू असतात, यावरून असे दिसते की आपण सध्या चौथ्या मन्वंतरात आहोत, आणि सातव्या मनुच्या अधिपत्याखाली आहोत, जे  विवस्वानाचे पुत्र असून त्यांनी सांगितलेले विधी आणि नियम मनुस्मृतीत प्राप्त होतात.

याज्ञवल्क्य स्मृती ही मनुस्मृतीप्रमाणेच सामान्य स्वरूपाच्या नियमांचे अनुसरण करते आणि महत्त्वाच्या दृष्टिकोनातून मनुस्मृति नंतर ची महत्वाची स्मृति होय. उर्वरित दोन स्मृती सध्या फारशा अभ्यासल्या जात नाहीत किंवा त्यांचा उल्लेखही केला जात नाही, फक्त दक्षिण भारतातील काही भागांमध्ये त्यांचा थोडा उपयोग होतो.

श्रुती आणि स्मृती या जशा सनातन धर्माचा आशारशीला आहेत, त्याप्रमाणे दोन इतर महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणजे पुराणे आणि इतिहास हे होत.

पुराणांमध्ये इतिहास, कथा आणि रूपकांची रचना असते, ज्याची रचना जनसामान्यांच्यासाठी, विशेषतः ज्यांना वेदांचा अभ्यास करता येत नाही अशांसाठी रचलेल्या आहेत.  ही पुराणे वाचायला खूप रंजक असून विविध प्रकारच्या माहितीने परिपूर्ण आहेत. त्यांतील काही प्रतिकात्मक रूपके ही समजायला कठीण असतात, आणि त्यासाठी गुरुच्या सहाय्याची आवश्यकता असते.

इतिहासामध्ये दोन महान काव्यांचा समावेश होतो:

1.     रामायण -  हे राजा दशरथाचे पुत्र श्रीरामचंद्र, त्यांची पत्नी सीता, आणि त्यांचे बंधू यांचा इतिहास आहे, ही कथा अतिशय रंजक व आनंददायक असून सुविख्यात आहे.

2.     महाभारत - उत्तर भारतातील कुरुवंशीय राजघराण्याची ही कथा जे घराणे पुढे कौरव आणि पांडव     अशा दोन गटात विभागले जाऊन त्यांच्यात एक महान युद्ध झाले. या ग्रंथामध्ये असंख्य रोचक  कथा, उदात्त नैतिक शिक्षण आणि सर्व प्रकारचे उपयुक्त धडे समाविष्ट आहेत.

रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ आपल्याला प्राचीन भारताबद्दल सर्वाधिक माहिती देतात,

 

सनातन धर्माचे विज्ञान आणि तत्त्वज्ञान

श्रुती आणि स्मृती, पुराणे आणि इतिहास हे जसे हिंदू धर्माची भव्य वास्तू निर्माण करतात,

विज्ञानाचे विभाजन षडङ्गांमध्ये – म्हणजेच सहा अंगांमध्ये – झाले होते; 'अंग' म्हणजे शब्दशः अर्थ  'अवयव' ही सहा अंग किंवा शाखा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लौकिक ज्ञान म्हणून ओळखल्या जातील. प्राचीन काळात मात्र धार्मिक व लौकिक ज्ञानामध्ये कोणताही भेद नव्हता.

 

या षडङ्गांमध्ये शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष कल्प यांचा समावेश होतो. तसेच चौसष्ट विज्ञान व कलांनाही या अभ्यासात स्थान होते, आणि याचे अध्ययन कसे करावे याची पद्धतीसुद्धा शिकवली जात होती. त्यामुळे जो कोणी या सहा अंगांचे ज्ञान आत्मसात करणारी व्यक्ती सखोल ज्ञानाने युक्त विद्वान मानली जात असे.

तत्त्वज्ञानालाही सहा भागांमध्ये विभागले होते - षड्दर्शनानि, म्हणजेच 'सहा दृष्टिकोन'  ज्यांना सामान्यतः 'षड्दर्शन प्रणाली' असे म्हणतात. या सर्वांचे एकच उद्दिष्ट असते - दुःखाचा अंत करणे,

न्याय आणि वैशेषिक दर्शन हे या जगातल्या सर्व गोष्टी एका ठराविक संख्येत विभागतात; मग ते सांगतात की मानव सर्व गोष्टी ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने, किंवा अनुमान व उपमेच्या साहाय्याने, अथवा इतर शहाण्या व अनुभवी व्यक्तींच्या साक्षीने जाणतो; त्यानंतर परमेश्वराने अणु आणि परमाणुंच्या माध्यमातून भौतिक सृष्टी कशाप्रकारे निर्माण झाली याचे विवेचन करतात.आणि शेवटी सर्वात श्रेष्ठ जो ईश्वर हा मानवाच्या अंतरात्म्यातही वास करणारा असून उपयुक्त ज्ञान म्हणजे ईश्वराचे ज्ञान आहे आणि हे ज्ञान विविध मार्गांनी कसे प्राप्त करता येते याचे प्रतिपादन यात केले आहे.

सांख्य दर्शन अधिक सविस्तरपणे नव्या पद्धतीने या सृष्टीतील दोन प्रधान तत्त्वांचे म्हणजेच पुरुष  म्हणजेच आत्मा किंवा चैतन्य आणि प्रकृती  म्हणजेच पदार्थ वा जग यांचे स्वरूप समजावून सांगते,

योग दर्शन सांगते की जसे आता सामान्यतः ज्ञात असलेली पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये आहेत, तसेच आणखी सूक्ष्म इंद्रिये अस्तित्वात आहेत; ज्या पुरुषाला ईश्वराचे स्वरुप जाणण्याची इच्छा आहे त्याने आपल्यामधील सूक्ष्म ज्ञान स्त्रोतांना जागृत करावे.  

मीमांसा दर्शन हे कर्माचे स्पष्टीकरण देते. कर्म म्हणजेच क्रिया यात धार्मिक आणि लौकिक दोन्ही क्रिया यांचे स्पष्टीकरण करून या कर्मांचे  परिणाम आणि कारणे, आणि ही कर्मे व्यक्तीला या भाव बंधनात कशाप्रकारे बांधतात याचे विवेचन करते.

सरते शेवटी वेदांत दर्शन ईश्वराचे, आत्म्याचे स्वरूप काय आहे हे सांगते. आत्मा आणि ब्रह्माच्या तादात्म्यावर प्रकश टाकते. आणि मानवाने कशा पद्धतीने जीवन जगावे म्हणजे कर्म त्याला बंधनात अडकवू शकणार नाही याचे विवेचन करते; ज्याद्वारे हे संपूर्ण जग उत्पन्न होते, दिसते व नाहीसे होते अशा ईश्वराच्या शक्तीचे म्हणजेच मायेचे स्वरुप स्पष्ट करते. आणि योग विद्येचा अभ्यास करून मानव स्वतःला त्या ईश्वरामध्ये विलीन कसे करू शकेल आणि त्याच्याशी एकरूप होऊन मोक्ष कसा प्राप्त करू शकेल याचे विवेचन करते.' 

संदर्भ: १९१६ साली Central Hindu College Banaras येथून प्रकाशित झालेल्या SANATAN DHARMA AN ELEMENTARY TEXTBOOK - OF HINDU RELIGION AND ETHICS या मूळ इंग्रजी पुस्तकातील अनुवाद क्रमशः...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature